Earthquake Esakal
ग्लोबल

Taiwan Nepal Earthquake: तैवानमध्ये 5.6 रिश्टर स्केल भूकंपाचे तीव्र झटके, नेपाळही हादरलं

तैवानची राजधानी तैपेई येथे आज(मंगळवारी) सकाळी ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, तर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

तैवान आज (मंगळवारी) पहाटे तीव्र भूकंपाच्या झटक्यांनी हादरले आहे. तैवानची राजधानी तैपेईमध्ये आज(मंगळवारी) सकाळी 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी तैपेईमध्ये तीव्र धक्क्यामुळे इमारतींमध्ये कंपने जाणवली.

तैवानची राजधानी तैपेईमध्ये आज (मंगळवारी) सकाळी 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी तैपेईमधील इमारती हादरू लागल्या. मात्र, यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तैवानच्या सेंट्रल वेदर ब्युरोने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू बेटाच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्रात होता.

नेपाळमध्येही हादरे

नेपाळमध्ये आज (मंगळवारी) सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, राजधानी काठमांडूमध्ये आज (२४ ऑक्टोबर) पहाटे ४:१७ वाजता ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

दोन दिवसात चार देशांना भूकंपाचे हादरे

मागील दोन दिवसात भारतासह चार देशांमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. तैवान, म्यानमार, नेपाळसह भारतातील जम्मू-काश्मीरच्या काही भागात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. काल (सोमवारी) सकाळी सहा वाजता म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.३ इतकी नोंदवली.

भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये पृष्ठभागाखाली ९० किलोमीटरवर होता. मिझोराममध्ये रविवार-सोमवारच्या मध्यरात्री २ वाजून ०९ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ नोंदवण्यात आली. मिझोरामच्या राजधानीत भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT