Panjshir Sakal
ग्लोबल

अखेर पंजशीरवर हल्ला, सात ते आठ तालिबानी ठार

घनघोर लढाईची सुरुवात?

दीनानाथ परब

काबुल: तालिबानने (taliban) अखेर पंजशीर खोऱ्यावर हल्ला (attack on panjshir) केला आहे. सोमवारी रात्री झालेल्या लढाईत सात ते आठ तालिबानींना कंठस्नान घातल्याचा दावा फहीम दाष्टी यांनी केला आहे. ते अहमद मसूदचे प्रवक्ते आहेत. अहमद मसूद (Ahmad Massoud) पंजशीर खोऱ्यात तालिबान विरोधी चळवळीचे नेतृत्व करत आहे. तालिबानने पंजशीर खोरे वगळता संपूर्ण अफगाणिस्तानवर (afganistan) नियंत्रण मिळवले आहे. रशियन फौजा आणि तालिबानला आतापर्यंत कधीच पंजशीर जिंकता आलेले नाही. पंजशीरमध्ये तालिबानला विरोध करण्यासाठी अफगाण लष्करातील योद्धे आणि अन्य फायटर्स एकवटले आहेत.

युद्ध आणि शांततेसाठी आम्ही तयार आहोत, असे पंजशीरमधल्या योद्ध्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तालिबानना अन्य प्रांतांप्रमाणे पंजशीर सहजतेने मिळवता येणार नाही, हे आधीच स्पष्ट होतं. तिथे घनघोर लढाईची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि आता सुरुवात त्या दिशेने होताना दिसत आहे. फहीम दाष्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री तालिबानने हल्ला केला. यामध्ये दोन्ही बाजूला लोक जखमी झाले आहेत.

सात ते आठ तालिबानी बंडखोर ठार झाल्याची माहिती त्यांनी दिली. कालच अमेरिकन सैन्य तब्बल २० वर्षांनी अफगाणिस्तानातून बाहेर पडलं. यापूर्वी टप्याटप्याने त्यांनी आपलं सैन्य कमी केलं होतं. माजी राष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांना टि्वट करता येऊ नये, यासाठी तालिबानने रविवारी पंजशीरची इंटरनेट सेवा खंडीत केली होती. सालेह पंजशीरमध्ये आहेत. तिथे तालिबान विरोधात लढण्यासाठी फौज उभी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

पंजशीरला नैसर्गिक संरक्षण

हिंदकुश पर्वतरांगांमध्ये पंजशीर खोर आहे. निर्सगाने समृद्ध असलेला हा प्रदेश नॉर्दन अलायन्सचा बालेकिल्ला आहे. तालिबान तसेच रशियन फौजांना आतापर्यंत कधीही येथे विजय मिळवता आलेला नाही. उंच डोंगररांगा, अरुंद खोरं आणि पंजशीर नदीने दिलेलं नैसर्गिक संरक्षण यामुळे पंजशीरची लढाई तालिबानसाठी अवघड असेल. पंजशीर खोऱ्याकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर देशभक्त तजाक फायटर्स तैनात आहेत.

कट्टर तालिबान विरोधक अहमद शाह मसूद

अमरुल्ला सालेह यांचा अहमद मसूदसोबतचा फोटो सोशल मीडियावरुन समोर आला आहे. अहमद मसूद हा दिवंगत नेते अहमद शाह मसूद यांचा मुलगा आहे. अहमद शाह मसूद हे कट्टर तालिबान विरोधक म्हणून ओळखले जायचे. तालिबान विरोधात लढण्याची तयारी असलेले अफगाण सैनिक पंजशीरमध्ये दाखल होत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. ९/११ हल्ल्याआधी २००१ मध्येच अलकायदा आणि तालिबानने कट रचून अहमद शाह मसूद यांची हत्या घडवून आणली. अहमद शाह मसूद यांचा पंजशीरमध्ये दबदबा होता. त्यांच्या शब्दाला मान होता.

पंजशीर किल्ला

१९७०-८० च्या दशकात सोविएत फौजांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. पण त्यांना पंजशीर मिळवता आले नाही. पुन्हा एकदा पंजशीर तालिबान विरोधाचे मुख्य केंद्र बनू शकते. नॉर्दन अलायन्ससाठी पुन्हा एकदा स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची, संघटना मजबूत करण्याची हीच संधी आहे. नॉर्दन अलायन्सचा वेगळा झेंडा असून पंजशीरमध्ये तो डौलाने फडकत आहे. नॉर्दन अलायन्स एक लष्करी आघाडी आहे. तालिबान सारखेच इथे सुद्धा योद्धे आहेत. तालिबान विरोधात लढण्यासाठी हा अलायन्स आकाराला आला. इराण, भारत, तजाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांकडून नॉर्दन अलायन्सला मदत आणि बळ मिळाले. १९९६ ते २००१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. त्यावेळी नॉर्दन अलायन्सनेच त्यांना संपूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवण्यापासून रोखले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT