काबूल: अफगाणिस्तानात तालिबान (taliban) आणि अफगाण सैन्यामध्ये (Afagn army) जोरदार लढाई सुरु आहे. तालिबान अफगाणिस्तानातील एकएक प्रांत काबीज करत चालला आहे. तालिबानने आता भारताने अफगाणिस्तानला गिफ्ट म्हणून दिलेले हेलिकॉप्टर (helicopter) ताब्यात घेतले आहे. भारताने अफगाणिस्तानच्या सैन्य दलाला Mi-24 हे फायटर हेलिकॉप्टर भेट म्हणून दिले होते. हे हेलिकॉप्टर आता आपल्या ताब्यात असल्याचा तालिबानचा दावा आहे.
कांदुजमधून काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये तालिबानी दहशतवादी हेलिकॉप्टरच्या शेजारी उभे असलेले दिसत आहेत. या Mi-24 हेलिकॉप्टरवर रॉटर ब्लेड दिसत नाहीयत. तालिबानला या हेलिकॉप्टरचा वापर करता येऊ नये, यासाठी अफगाण सैन्याने त्याचे रॉटर ब्लेड काढून टाकल्याची शक्यता आहे.
भारताने २०१९ मध्ये तीन चीता हेलिकॉप्टर सोबत अफगाणिस्तानच्या एअर फोर्सला Mi-24 हेलिकॉप्टर गिफ्ट म्हणून दिले होते. २०१५ मध्ये चार लढाऊ हेलिकॉप्टर अफगाणिस्तानाला दिली होती. त्यांच्याजागी २०१९ मध्ये Mi-24 हेलिकॉप्टर गिफ्ट म्हणून देण्यात आले होते.
अफगाणिस्तानात तालिबानची आगेकूच कायम आहे. तालिबाने वेगाने प्रदेश ताब्यात घेत चाललाय. अफगाणिस्तानचा ६५ टक्के प्रदेश तालिबानने ताब्यात घेतलाय. दरदिवशी वेगवेगळी शहरे तालिबानच्या ताब्यात जात आहेत. बळकावलेल्या भागावर तालिबानने जुलूम सुरु केलेत. महिलांवर अत्याचार सुरु आहेत. हजारो लोकं आपलं घरदार सोडून सुरक्षित स्थळी पलायन करत आहेत. आता मजार-ए-शरीफसाठी जोरदार लढाई सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.