osama bin laden 
ग्लोबल

9/11 च्या हल्ल्यात लादेनचा हात नव्हता; तालिबानचे अमेरिकेवरच आरोप

सकाळ डिजिटल टीम

दहशत माजवून अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानने आता अमेरिकेवर निशाणा साधला आहे.

दहशत माजवून अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानने आता अमेरिकेवर निशाणा साधला आहे. काबुल ताब्यात घेतल्यानंतर सातत्यानं तालिबान त्यांची चांगली प्रतिमा जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दहशतवाद्यांचीही बाजू घेत असल्याचं दिसून आलं आहे. आता तालिबानने असं म्हटलं की, 9/11 च्या हल्ल्यामागे अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा हात नव्हता. युएसएवर झालेल्या 11 सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यांमागे सूत्रधार लादेन नव्हता आणि याचा वापर अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये युद्धासाठी केला होता असा आरोपही तालिबानने केला आहे.

एनसीबी न्यूजला तालिबानी प्रवक्ता जबीबुल्लाह मुजाहिदने मुलाखत दिली. यामध्ये म्हटलं की, अफगाणिस्तानात गृहयुद्धाच्या 20 वर्षांनंतरही ओसामा बिन लादेनचा अमेरिकेवरील हल्ल्यात सहभाग असल्याचा कोणताच पुरावा नाही. या युद्धाचे काहीच कारण नव्हते आणि 9/11 चा हल्ला हा अमेरिकेकडून युद्धासाठीचं एक निमित्त म्हणून वापरण्यात आला होता.

तालिबान पुन्हा अफगाणिस्तानात अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांना बळ देणार नाही याची खात्री देणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना तालिबान प्रवक्त्याने म्हटलं की, आम्ही सातत्यानं सांगितलं आहे की अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाला सुरक्षित जागा नाही. जेव्हा लादेन अमेरिकेसाठी अडचणीचा झाला तेव्हा तो अफगाणिस्तानात होता. मात्र त्याच्या सहभागाचा कोणताच पुरावा नव्हता. आम्ही आता वचन दिलं आहे की कोणाही विरोधात अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर केला जाणार नाही.

अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यात अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत उद्ध्वस्त झाली होती. या जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात 2996 जणांचा मृत्यू झाला होता. अमरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ही घटना देशाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचं म्हटलं होतं. अल कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी 4 प्रवाशी विमाने हायजॅक केली होती आणि त्यातील दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरला धडकली होती. यात विमानातील प्रवाशांसह इमारतीमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Farmer : भरपाईपासून ५० हजार शेतकरी वंचित,गतवर्षी रब्बी हंगामात झाले होते पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT