Gulabuddin Amiri
ग्लोबल

तालिबानचा अफगाणिस्तानवर कब्जा, लवकरच नामांतराची शक्यता

नामदेव कुंभार

अफगाणिस्तानात सध्या मोठी अनागोंदी सुरु आहे. अमेरिका आणि नाटो फौजा यांनी माघार घेताच आठवडाभरातच तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तावर कब्जा मिळवला आहे. अवघ्या आठवडाभरातच तालिबानी बंडखोरांनी जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. रविवारी तालिबान्यांनी राजधानी काबूलमध्ये प्रवेश करत राष्ट्रपती भवनाही ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं. कोणत्याही क्षणी तालिबानी अफगाणिस्तानर कब्जा केल्याची घोषणा करु शकतात. अन् लवकरच अफगाणिस्तानच्या नामांतराची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) असं तालिबानी जाहीर करणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अमेरिका आणि नाटो यांनी जवळपास 20 वर्ष अफगाणी सुरक्षा दलांची बांधणी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. तरीही तालिबान्यांनी अवघ्या आठवडाभरात संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला.

अफगाणिस्तानमध्ये सत्तांतराचं काम सुरु झालं आहे. लवकरच अफगाणिस्तानचं नामांतर ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) असं होणार आहे. यासाठी माजी राष्ट्रपती हामिद करजई, अब्दुल्ला अब्दुल्ला आणि माजी तालिबान नेता गुलबुद्दीन हिकमतयार यांनी एका कमिटीची स्थापना केली आहे. जी शांततापूर्ण हस्तांतरण करण्यास मोलाची भूमिका बजावतील.

व्हियतनामची पुनरावत्ती होऊ देणार नसल्याचं वक्तव्य, अमेरिकेचे विदेश मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी सांगितलं. तालिबान्यांनी काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर दुतावासमधील उर्वरीत कर्मचाऱ्यांनाही सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरु आहे, असेही ते म्हणाले. अफगाणिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय नागरिकांना देश सोडण्याची परवानगी मिळायली हवी. त्यासाठी रस्ते, विमानतळ आणि सर्व सीमा उघडण्यात याव्यात आणि शांततापूर्ण स्थलांतर व्हावे. अफगाणिस्थानमधील लोकांना शांततेत राहायचे आहे. आम्ही त्यांच्या मदतीसाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया अमेरेकेनं दिली आहे. काबूल विमानतळावर अमेरिकेन सैनिकांनी ताबा मिळवला आहे. सैनिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं समजतेय.

अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या वर्चस्वानंतर संयुक्त राष्ट्राने आज, सोमवारी सकाळी दहा वाजता तातडीने बैठक बोलवली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तालिबानने अफगाण सरकारचा शेवटचा किल्ला काबूलवरही विजय मिळवला. याचबरोबर तालिबानने 20 वर्षांनंतर काबूलमध्ये पुन्हा एकदा सत्ता राखली आहे. सन 2001 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तालिबान्यांना काबूल सोडून पळ काढावा लागला होता. ताज्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडल्यानंतर उजबेकिस्तानात आश्रय घेतला आहे. अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊन सत्तेचे शांततापूर्ण हस्तांतर करावे, असे आवाहन तालिबान्यांनी केलं. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने कतारमधील अल-जझीरा वृत्तवाहिनीला याबाबत प्रतिक्रिया दिली. अफगाणिस्तानातील काबुल येथून 129 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विमान AI244 दिल्लीत उतरलं आहे. जगाने अफगाणिस्तानकडे पाहणं सोडून दिलंय, यावर माझा विश्वास बसत नाही. आमचे तिथले मित्र मारले जाणार आहेत. ते (तालिबान) आम्हाला मारणार आहेत. आमच्या महिलांना यापुढे कोणतेही अधिकार मिळणार नाहीत, ”असे काबूलहून दिल्लीत आलेल्या एका महिलेने सांगितले.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी म्हटलंय की, लूट आणि अराजकता रोखण्यासाठी त्यांच्या तालिबानी सैन्याने काबुल आणि अफगाणिस्तानच्या काही भागात प्रवेश करतील आणि सुरक्षा दलांनी रिकामी केलेल्या चौकी ताब्यात घेतील. त्यांनी शहरात केलेल्या या प्रवेशामुळे लोकांनी घाबरू जाऊ नये, असे आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT