Pm Narendra Modi Team eSakal
ग्लोबल

पाकिस्तानला धडा शिकवा; पीओकेच्या कुटुंबाचे मोदींना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील (Pakistan-occupied Jammu and Kashmir) मुझफ्फराबाद येथील कुटुंबाला प्रशासनाने घराबाहेर हाकलून दिले आहे. त्यामुळे त्यांना थंडीत रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे. या कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना दडपशाहीतून मुक्त करण्याचे आवाहन (POKs family appeal) केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मलिक वसीमने त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी भारताला हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

पोलिस आणि प्रशासनाने आमचे घर सील केले आहे. व्हिडिओमध्ये वसीम मलिक त्याची पत्नी आणि मुले रस्त्यावर बसलेली दिसत आहेत. मुझफ्फराबाद प्रशासनाकडून आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे. आम्हाला काही झाले तर त्याला मुझफ्फराबादचे आयुक्त आणि तहसील जबाबदार असतील, असे वसीम मलिक म्हणाले.

स्थानिक प्रशासनाने वसीम मलिक यांना घरातून हाकलून दिले आहे. एका प्रभावशाली व्यक्तीने त्यांची जमीन ताब्यात घेतली आहे. पोलिसांच्या मदतीने त्या व्यक्तीने त्यांच्या घराचा ताबा घेतला आहे. ही जमीन भारताची आहे आणि तिची मालकी बिगर हिंदू आणि मुस्लिमांकडे आहे, असा तो व्यक्ती म्हणत असल्याचे मुझफ्फराबादमधील सूत्रांचा हवाला देत एएनआयने सांगितले.

पोलिसांनी हजारो कुटुंबांची घरे सील केली आहेत आणि थंडीत त्यांना रात्र रस्त्यावर काढावी लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पाकिस्तानला (Pakistan) धडा शिकवावा (Teach Pakistan a lesson) आणि लोकांना अत्याचारातून मुक्त करावे. ही तुमची मालमत्ता आहे. ही मालमत्ता बिगर मुस्लिम आणि शिखांची आहे, असेही वसीम मलिक म्हणाले.

आत्महत्या करण्याची धमकी दिली

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Pakistan-occupied Jammu and Kashmir) अनेकदा स्थानिक लोक प्रशासनाच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. पीओके हा भारताच्या जम्मू-काश्मीर (Pakistan-occupied Jammu and Kashmir) प्रांताचा अविभाज्य भाग आहे. ज्यावर पाकिस्तानने (Pakistan) बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. ऑक्टोबर १९४७ पासून हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि लोकांनी अत्याचाराविरोधात अनेकदा आवाज उठवला आहे. हा भाग पाकिस्तानच्या मागास भागांपैकी एक आहे. वसीम मलिक यांनी घर परत न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT