टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांना शनिवारी रात्री उशिरा अझरबैजानहून खासगी जेटमधून उतरल्यानंतर काही वेळातच पॅरिसच्या ले बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांची गर्लफ्रेंड समजल्या जाणाऱ्या युलिया वाविलोवा यांनाही अटक करण्यात आल्याचा दावा अहवालात केला आहे.
वृत्तसंस्था AFP ने वृत्त दिले आहे की, पावेल दुरोव यांना अटक झाल्यापासून त्यांचे कुटुंबीय संपर्क साधू शकले नाहीत.
आता असे बोलले जात आहे की, त्यांची गर्लफ्रेंड मानली जाणारी युलिया वाविलोवा देखील त्यांच्या अटकेचे कारण असू शकते.
दरम्यान, युलिया वाविलोवा अनेक प्रसंगी पावेल दुरोव यांच्यासोबत दिसल्या आहेत आणि पॅरिसला पोहोचल्यावर खाजगी जेटमध्येही त्या त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी यापूर्वी पावेल दुरोव्ह यांच्या जेटमधून इंस्टाग्राम स्टोरीज पोस्ट केल्या आहेत आणि पॅरिसमध्ये एकत्र असताना त्यांचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
कंपनीचे म्हणणे आहे की, टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही आणि ते अनेकदा युरोपला जातात. त्या टेलिग्रामच्या गैरवापराला कंपनी किंवा त्याचा मालक जबाबदार असल्याचा दावा करणे मूर्खपणाचे आहे.
पावेल दुरोववर कंटेंट मॉडरेशन हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. फ्रेंच पोलिसांचा असा दावा आहे की त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर अंमली पदार्थांची तस्करी, लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट शेअर करणे आणि मनी लॉन्ड्रिंग यांसारख्या अनेक बेकायदेशीर क्रियाकलापांसाठी केला जात आहे.
पावेल दुरोव यांना त्यांच्या दोन माजी प्रेयसींपासून पाच मुले आहेत. दुरोव यांनी नुकतेच दावा केला होता की, शुक्राणू दान केल्याने ते 100 मुलांचे बाप आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.