Ten Major Points in Ukraine Russia Conflict Google
ग्लोबल

Ukraine Russia Conflict : युक्रेनचे दोन तुकडे, नेमकं काय घडलं? १० महत्वाचे मुद्दे

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमधील वाद (Ukraine Russia Conflict) टोकाला पोहोचला आहे. आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील पूर्व भागाचे दोन तुकडे केले आहे. डोनेत्स्क आणि लुहान्स्क (Donetsk And Luhansk) या दोन भागांना स्वतंत्र राष्ट्राची मान्यता देत असल्याची घोषणा पुतीन यांनी केली. या वादात नेमकं काय घडलं? हे दहा मुद्द्यात समजून घेऊयात. (Ten Major Points in Ukraine Russia Conflict)

  1. डोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन्ही भागाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी त्यांना स्वतंत्र्य राष्ट्राची मान्यता देणे गरजेचे आहे, अशी घोषणा बंडखोर प्रातांचे तुकडे करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी व्लादीमीर पुतिन यांनी केली.

  2. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या निर्णयाचा निषेध केला आहे. त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि जर्मन चान्सलर यांच्यासोबत चर्चा केली असून युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशिवावर संपूर्ण निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. तसेच आंतराराष्ट्रीय समर्थन देखील मागितले आहे.

  3. संयुक्त राष्ट्राने पूर्व युक्रेनमधील रशियाने नव्याने मान्यता दिलेले बंडखोर प्रदेश डोनेत्स्क आणि लुहान्स्क यावर आर्थिक निर्बंध जाहीर केले आहेत. मात्र, अद्याप रशियावर निर्बंध लावण्यात आले नाही. पण, अमेरिका रशियावर निर्बंध लावण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

  4. रशियाविरोधात कारवाई करण्यासाठी एक आदेश काढण्यात आला. त्यावर स्वाक्षरी करताना जो बायडन म्हणाले, ''आंतरराष्ट्रीय कायद्याच्या घोर उल्लंघनातून रशियाला नफा मिळणार नाही. यासाठी एक कार्यकारी आदेश काढला असून मी त्यावर स्वाक्षरी केली आहे. पुढील कारवाईसाठी युक्रेनसह सहकारी राष्ट्रांसोबत सल्लामसलत करत आहोत.''

  5. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांताना स्वतंत्र मान्यता देण्याच्या रशियाच्या कृतीचा निषेध केला आहे आणि युरोपियन युनियनला मॉस्कोवर नवीन निर्बंध लादण्याची विनंती केली आहे.

  6. "आता अराजकता माजवणाऱ्या घटकांवर कारवाई न करण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही शांततापूर्ण मार्गाने चालणार आहोत. आम्ही त्याचे पालन करू. आम्ही आमच्या भूमीवर आहोत आणि आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्हाला कोणाचेही देणेघेणे नाही. आम्ही कोणाला काही देणार नाही,'' असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले

  7. शांती रक्षक दल 'डोनेत्स्क'मध्ये आपलं वर्चस्व निर्माण करत आहे, असं काही स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जर युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिल्यास जपान अमेरिकेच्या बाजूने असेल. अमेरिका रशियावर लादत असलेल्या निर्बंधांमध्ये जपान सहभागी होईल, असं वृत्त जपानच्या स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.

  8. एएफपीच्या म्हणण्यानुसार, संयुक्त राष्ट्रे आणि फ्रान्ससह पाश्चात्य देशांनी रशियाने मित्र युक्रेनमधील फुटीरतावादी प्रदेशांना मान्यता दिल्याच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीची विनंती केली आहे. युक्रेनने संयुक्त राष्ट्रांना दिलेल्या पत्राच्या आधारे बैठकीची विनंती करणाऱ्या देशांमध्ये युनायटेड किंगडम, आयर्लंड आणि अल्बानिया यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  9. युक्रेनच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर लढाऊ विमाने, रणगाडे, हेलिकॉप्टर आणि अवजड शस्त्रास्त्रांसह रशियन सैन्य तैनात असल्याचा दावा पाश्चिमात्य देशांनी केला आहे. हे सर्व मारुसच्या प्रदेशात युद्ध करणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

  10. युक्रेननेही रशियाला हल्ल्याच्या विरोधात इशारा दिला असून जगभरातील अनेक देश आधीच मॉस्कोवर निर्बंध लादण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. आम्ही जगातील राष्ट्रांसोबत चर्चा करून निर्बंधांबाबत विचार करू, असं युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT