terror attack in pakistan increased in on narendra modi tenure said don report  
ग्लोबल

मोदी आल्यापासून पाकिस्तानवर संकट! आत्मघातकी हल्ले वाढले, मृत्यूंच्या संख्येत २२८ टक्क्यांनी वाढ

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आत्मघातकी हल्ल्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. २०२३ मध्ये सर्वाधिक आत्मघातकी हल्ले झाले आहे. यातील जवळपास अर्ध्या हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलांना निशाणा बनवण्यात आलं आहे. पाकिस्तानची प्रसिद्ध वृत्तसंस्था डॉनने यासंदर्भातील रिपोर्ट दिलाय. रिपोर्टमध्ये १० वर्षांमध्ये या वर्षी सर्वाधिक हल्ले झाले आहेत. (terror attack in pakistan incresed in on narendra modi tenure said don report)

इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्योरिटी स्टडीज (PICSS) चा हवाला देत डॉनने हा रिपोर्ट समोर आणला आहे. २०२३ मध्ये तब्बल २९ आत्मघातकी हल्ले झाले आहेत. यात ३२९ लोकांचा मृत्यू झालाय, तर ५८२ लोक जखमी झालेत. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, मृत्यू झालेल्यांमध्ये ४८ टक्के सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २०१३ नंतरचा हा सर्वाधिक आकडा असल्याचं सांगण्यात येतंय. २०१३ मध्ये ४७ आत्मघातकी हल्ल्यांमध्ये ६८३ लोकांचा मृत्यू झाला होता.

२०२२ च्या आकड्यांची तुलना केल्यास २०२३ मध्ये हल्ल्यांची संख्या ९३ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच मृतांच्या संख्येमध्ये तब्बल २२६ टक्क्यांनी वाढ झालीये. तसेच जखमी होणाऱ्या लोकांच्या संख्येत १०१ टक्क्यांनी वाढ झालीये. सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता आहे. त्याच्यामुळे हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, दहशतवाद्यांचे प्राबल्य असलेल्या खैबर पख्तूनख्वामध्ये सर्वाधिक हल्ले झालेत. येथील २३ घटनांमध्ये २५४ लोकांचा मृत्यू झालाय आणि ५१२ लोक जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमध्ये एकूण ५ हल्ले झालेत. यात ६७ लोकांचा मृत्यू तर ५२ लोक जखमी झालेत. सिंध प्रांतात एक हल्ला झाला असून त्यात ८ जणांना मृत्यू झालाय, तर १८ जण जखमी झालेत.

रिपोर्टनुसार, २०१४ मध्ये आत्मघातकी हल्ले ३० होते, त्यात घट होऊन २०१९ मध्ये ते केवळ तीन झाले होते. पण, २०२२ मध्ये त्यात अचानक वाढ झालीये. २०२२ मध्ये १५ आत्मघातकी हल्ले झाले. ज्यात १०१ लोकांचा मृत्यू झाला आणि २९० लोक जखमी झाले. २०२३ मध्ये हल्ल्यांमध्ये आणखी वाढ झालीये.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT