वॉशिंग्टन : भारतात कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना (Terrorist) अद्यापही पाकिस्तानमध्ये (Pakistan) सक्रीय असून पाकिस्तान सरकार त्यांच्याविरोधात काहीही कारवाई करताना दिसत नाही, असे अमेरिकेच्या (America) परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. ‘जैशे महंमद’चा प्रमुख आणि जागतिक दहशतवादी मसूद अझर याच्यासह मुंबई हल्ल्यात सहभागी असलेला साजिद मीर असे दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.
दहशतवादासंदर्भात अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात पाकिस्तानात अद्यापही अनेक दहशतवादी गट सक्रीय असल्याचे म्हटले आहे. ‘मसूद अझर आणि साजिद मीर यांच्यासारख्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई करणे आवश्यक असताना ते मुक्तपणे फिर आहेत.
अफगाणिस्तानमधील जनतेवर हल्ला करणारे अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्क सारखे गटही पाकिस्तानातूनच सर्व सूत्रे हलवितात,’ असे अहवालात म्हटले आहे. फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिलेली सर्वच उद्दीष्टे पाकिस्तानने पूर्ण केली नसल्याने ते अद्यापही ग्रे लिस्टमध्येच आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताचे कौतुक
दहशतवाद्यांचे अनेक कट उधळून लावल्याबद्दल अमेरिकेच्या अहवालात भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) कौतुक करण्यात आले आहे. भारताच्या इतर तपास यंत्रणांचीही दहशतवादाविरोधातील कामगिरी चांगली असल्याचे अहवालात म्हटले आहे. ‘एनआयए’ने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ‘इसिस’शी संबंधित ३४ प्रकरणांची हाताळणी करत १६० जणांना अटक केल्याची नोंद अहवालात आहे. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत किमान ६६ भारतीय वंशाचे लोक असल्याचे अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.