Top 10 World Earthquake : भूकंप ही एक अशी आपत्ती आहे जी थांबवणे अशक्य आहे. यासाठी दक्षता हाच एकमेव उपाय आहे. आफ्रिकेतील मोरोक्को येथे 8 सप्टेंबरच्या रात्री आलेल्या विनाशकारी भूकंपाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. जगात असे 10 शक्तिशाली भूकंप होऊन गेलेत त्याची आज माहिती घेऊया.
भूकंप, एक आपत्ती जी रोखणे अशक्य आहे. त्यामुळे सावधगिरी आणि दक्षता हाच उपाय आहे. नैसर्गिक आपत्तींसाठी आगाऊ तयारी केल्याने भूकंपासारख्या आपत्तींमुळे होणारी नासधूस काही प्रमाणात वाचू शकते.
आफ्रिकेतील मोरोक्को येथे 8 सप्टेंबरच्या रात्री आलेल्या विनाशकारी भूकंपाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या भूकंपामुळे दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मोरोक्कोच्या आधीही जगातील अनेक देशांमध्ये भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. आज आपण जगातील त्या दहा भूकंपांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांच्यामुळे झालेल्या विनाशाचा विचार करून आजही अंगावर काटा येतो.
भूकंप, एक आपत्ती जी रोखणे अशक्य आहे. त्यामुळे सावधगिरी आणि दक्षता हाच उपाय आहे. नैसर्गिक आपत्तींसाठी आगाऊ तयारी केल्याने भूकंपासारख्या आपत्तींमुळे होणारी नासधूस काही प्रमाणात वाचू शकते.
1. प्रिन्स विल्यम साउंड, अलास्का
28 मार्च 1964 रोजी अमेरिकेतील अलास्का येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 9.2 इतकी होती. त्यादरम्यान कॅनडासह आसपासच्या भागात या भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यादरम्यान सुमारे तीन मिनिटे पृथ्वी हादरत होती.
2. वाल्दिव्हिया, चिली
चिलीमध्ये 22 मे 1960 रोजी झालेल्या भूकंपात 1655 लोकांचा बळी गेला होता, तर सुमारे तीन हजार लोक जखमी झाले होते. भूकंपानंतर सुमारे दोन लाख लोक बेघर झाले. या आपत्तीमुळे चिलीला अंदाजे US$550 दशलक्षचे नुकसान झाले. भूकंपाची तीव्रता 9.5 इतकी नोंदवण्यात आली.
3. गुजरात, भुज
गुजरातमधील भुज येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.7 एवढी होती. या भूकंपामुळे संपूर्ण शहर कचऱ्याचा ढिगारा बनले होते. कच्छ आणि भुजमध्ये तीस हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. दीड लाखांहून अधिक लोकांना भूकंपाचा फटका बसला.
4. पाकिस्तान, क्वेटा
8 ऑक्टोबर 2005 रोजी पाकिस्तानातील क्वेटा येथे झालेल्या भूकंपात 75 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता, तर 80 हजार लोक जखमी झाले होते. भूकंपाची तीव्रता 7.6 इतकी नोंदवण्यात आली.
5. इंडोनेशिया, सुमात्रा
इंडोनेशियातील सुमात्रा येथे 11 एप्रिल 2012 रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता 8.6 इतकी होती. भूकंपामुळे बरीच नासधूस झाली होती. या भूकंपात 227,898 लोकांचा मृत्यू झाला होता.
6. जपान, फुकुशिमा
11 मार्च 2011 रोजी जपानमधील फुकुशिमा येथे झालेल्या भूकंपात 18 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्या काळात जपानला आपत्तींचा सामना करावा लागला. भूकंपानंतर लगेचच जपानमध्ये सुनामी आली, ज्यामुळे लाखो लोक प्रभावित झाले.
7. फ्रान्स, हैती
13 जानेवारी 2010 रोजी हैती, फ्रान्समध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.0 इतकी होती. या भूकंपात सुमारे 3 लाख 16 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याचवेळी भूकंपामुळे ऐंशी हजार इमारती उद्ध्वस्त झाल्या.
8. दक्षिण अमेरिका, चिली
22 मे 1960 रोजी चिलीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 9.5 एवढी होती. हा जगातील सर्वात भीषण भूकंप मानला जातो, ज्यामध्ये सुमारे आठ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
9. दक्षिण आफ्रिका, मोरोक्को
आफ्रिकेतील मोरोक्को येथे झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत दोन हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, अद्यापही आकडेवारी स्पष्ट झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.