J. D. Vance sakal
ग्लोबल

J. D. Vance : जे. डी. व्हान्स यांची उपाध्यपदासाठी निवड;अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचा निर्णय

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आज उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ४० वर्षांचे सिनेटर जे. डी. व्हान्स यांची निवड केली. व्हान्स हे ओहियो राज्यातील सिनेटर आहेत. त्यांची पत्नी उषा चिलुकुरी या भारतीय वंशाच्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मिलवाऊकी : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आज उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ४० वर्षांचे सिनेटर जे. डी. व्हान्स यांची निवड केली. व्हान्स हे ओहियो राज्यातील सिनेटर आहेत. त्यांची पत्नी उषा चिलुकुरी या भारतीय वंशाच्या आहेत.

गोळीबारानंतर ट्रम्प हे कानाला पट्टी लावून रिपब्लिकन पक्षाच्या परिषदेला हजर झाले आहेत. या परिषदेत त्यांना अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली. यानंतर ट्रम्प यांनी व्हान्स यांची उपाध्यपक्षदासाठी निवड जाहीर केली. प्रदीर्घ चर्चेनंतर आणि विरोधी पक्षातील उमेदवारांचा अंदाज घेत व्हान्स यांची निवड करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. ट्रम्प यांनी नावाची घोषणा करताच व्हान्स आणि त्यांची पत्नी उषा हे दोघेही मंचावर गेले आणि त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.

व्हान्स हे लेखक असून त्यांचे ‘हिलीबिली एलेजी’ आणि ‘कल्चर इन क्रायसिस’ नावाची पुस्तके प्रसिद्ध आहेत. या पुस्तकांमध्ये श्‍वेतवर्णीय कामगार वर्गातील एका व्यक्तीची कथा रंगविण्यात आली आहे. हा वर्ग ट्रम्प यांचा प्रमुख मतदार आहे. व्हान्स हे सुरुवातीच्या काळात ट्रम्प यांचे टीकाकार होते. नंतर मात्र त्यांनी ट्रम्प यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून ट्रम्प यांची बाजू सातत्याने मांडली आहे.

ट्रम्प हे निवडून आल्यास व्हान्स हे अमेरिकेच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत युवा उपाध्यक्ष बनतील. याआधी १८५७ मध्ये ३६ वर्षांचे जॉन ब्रेकिनरिज आणि १९५३ मध्ये ४० वर्षे ११ दिवसांचे रिचर्ड निक्सन हे उपाध्यक्ष बनले होते.

ट्रम्प यांचे जल्लोषात स्वागत

गोळीबारातून थोडक्यात बचावलेले ट्रम्प परिषदेच्या ठिकाणी दाखल होताच रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. गोळीमुळे दुखापत झालेल्या कानाला त्यांनी पट्टी बांधली होती. समर्थकांमधून ‘फाइट, फाइट’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. ही परिषद चार दिवसांची असून परिषदेच्या अखेरच्या दिवशी ट्रम्प यांचे भाषण होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: आर्थिक व्यवहाराने निष्ठेवर मात केली; कट्टर शिवसैनिकाचा ठाकरेंवर गंभीर आरोप

अविनाश आणि ऐश्वर्या नारकरांचं नवं घर; दिवाळीच्या आधी दिली आनंदाची बातमी, व्हिडिओमधून शेअर केली खास झलक

Latest Maharashtra News Updates : Canada Politics Live: सुप्रिया सुळेंनी केलं हर्षवर्धन पाटलांचं औक्षण

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार; 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची नराधमांनी दिली धमकी

SL vs WI ODI: वेस्ट इंडिजच्या शेपटाने झोडले! ९व्या विकेटसाठी १९९ धावा जोडल्या; तरीही श्रीलंकेने डाव साधला, जिंकली मालिका

SCROLL FOR NEXT