ग्लोबल

कोरोनाचा ‘डेल्टा’ प्रकार अधिक घातक; ‘WHO’च्‍या प्रमुखांची चिंता

विनायक होगाडे

जीनिव्हा : जगभरात लोक आता कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा’ प्रकाराने बाधित होत आहेत. सुमारे १०० देशांमध्‍ये ‘डेल्टा’चा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे संपूर्ण जगासाठी कोरोनाच्या जागतिक साथीचा हा सर्वांत धोकादायक काळ आहे, असे चिंता जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) सरचिटणीस टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी शुक्रवारी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ‘कोरोनाचा डेल्टा अवतार अनेक देशांत मुख्य विषाणूच्या रूपात वेगाने परावर्तित होत आहे. कोरोनाचा अतिशय घातक काळ सध्या आपण अनुभवत आहोत. हा प्रकार धोकादायक असून त्यात सातत्याने बदल दिसून येत असल्याने आपल्याला सार्वजनिक आरोग्यसेवेकडे सातत्याने लक्ष देऊन ती बळकट करण्यावर भर दिला पाहिजे. ज्‍या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, तेथे रुग्णालये भरून वाहत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. अद्याप एकाही देशाचा धोका टळलेला नाही.

सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपायांचे पालन

‘डेल्टा’ हा अवतार ९८ देशांत दिसून आला आहे. लसीकरण कमी अथवा जास्त झालेल्या देशांतही तो वेगाने पसरतो आहे. या नव्या अवताराला रोखण्यासाठी देशांसमोर दोनच मार्ग आहेत ते म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवा आणि सामाजिक उपाय. उदा. कठोर सर्वेक्षण, चाचण्यांवर भर देणे, लवकरात लवकर निदान होणे, विलगीकरण आणि वैद्यकीय उपचार हे महत्त्वपूर्ण आहेत. त्याचबरोबर मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीची ठिकाणे टाळणे व बंदिस्त जागांमध्ये हवा खेळती राहील, अशी व्यवस्था करणेही गरजेचे आहे, असे घेब्रेयेसूस म्हणाले. संरक्षक उपकरणे, ऑक्सिजन, चाचण्या, उपचार आणि लसीकरण यात जगाला समान वाटा मिळायला हवा. पुढील वर्षात या काळापर्यंत ७० टक्के नागरिकांना लस मिळावी यासाठी सर्व जगाने एकत्र काम करायला हवे, असे आवाहन मी यापूर्वीच केली होती, असेही त्यांनी सांगितले.

लसीकरणाबद्दल ‘WHO’ म्हणते...

  • - लशींचे आतापर्यंत तीन अब्ज डोस वितरित झाले आहेत

  • - संपूर्ण जगासाठी ११ अब्ज डोसची गरज

  • - साथीचा प्रभाव कमी करणे, अर्थव्यवस्था सुरळीत करणे व आणखी घातक प्रकारांना रोखण्यासाठी लसीकरण आवश्‍यकच

  • - सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रत्येक देशातील दहा टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्व व्हावे

  • - लस निर्मात्या कंपन्यांनी त्यांचे तंत्रज्ञान खुले करावे. यातून नव्या उत्पादनाला गती मिळेल

  • - जेवढ्या वेगाने लसीकरण क्षमता वाढवू, तेवढ्या लवकर साथीचा नायनाट करणे शक्य

  • - गरीब देशांमध्ये लशींचे दोन टक्क्यांपेक्षा कमी डोस उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT