नवी दिल्ली- पहिले महायुद्ध किती भयानक होते हे आपण आजही ऐकतो. या युद्धाने जगाचा चेहरा बदलला होता. युद्धाच्या शेवटच्या दिवसांमध्ये संघर्ष चरम सीमेला पोहोचला होता. युद्धाचा प्रसंग पाहण्यासाठी भयानकच असतो. ज्या लोकांनी युद्ध प्रत्यक्ष पाहिलं ते या युद्धाची तीव्रता आपल्याला सांगू शकतील. पण, युद्धाच्या काळातील संघर्षादरम्यानचा आवाज आपल्याला ऐकायला मिळण्याची संधी मिळाली आहे.
@historieshub ने सोशल मीडिया व्यासपीठ इंस्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पहिल्या विश्वयुद्धाच्या शेवटच्या क्षणाचे आवाज कैद करण्यात आले आहेत. कोणत्या अज्ञात सैनिकाने किंवा नागरिकाने हा आवाज रिकॉर्ड केल्याचं सांगितलं जातं. रिकॉर्डिंगमध्ये युद्धाच्या काळातील भयानक आणि अंगावर काटा आणणारे आवाज ऐकायला मिळत आहे. (the haunting sounds of the final moments of World War I The video is going viral)
रिकॉर्डिंगमध्ये वेगवेगळे पण भयानक आवाज ऐकू येत आहेत. गोळीबार, तोफा, स्फोट, आग, बॉम्बहल्ले यांचा आवाज ऐकायला मिळत आहे. पहिले महायुद्ध १९१४ ते १९१८ या काळामध्ये लढले गेले. या काळात जगातील अनेक देशांमध्ये संहार सुरु होता. सगळीकडे अराजकता, अशांतता पसरली होती. चार वर्षांच्या काळात मानवाने विध्वंस काय असतो हे पाहिलं.
पहिले महायुद्ध हा जगासाठी मोठा धक्का होता. इतक्या मोठ्या पातळीवर लढले गेलेले बहुदा हे पहिलेच युद्ध असेल. यूरोपमध्ये तर हाहाकार माजला होता. नोव्हेंबर १९१८ मध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे युद्धाचा शेवट झाला. पण, या काळात अनेक लोकांना, सैनिकांना आपला जीव गमवावा लागला होता. युद्ध काळातील संघर्षाचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑडिओमध्ये तोफांचा वर्षाव होत असल्याचं वाटत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून हा आतापर्यंत २ कोटी लोकांनी पाहिला आहे. अनेक लोक या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. लोकांना युद्धाच्या भयानकतेची छोटीशी झलक अनुभवायला मिळत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.