ग्लोबल

प्रजाती होतायत नष्ट; पर्यावरण बदलाचा परिणाम प्राण्यांच्या जननक्षमतेवर

विनायक होगाडे

मनुष्याबरोबरच वन्यप्राण्यांमधील जननक्षमता कमी होत असल्याचे पुरावे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.

कॅनबेरा : मनुष्याबरोबरच वन्यप्राण्यांमधील जननक्षमता (animal fertility) कमी होत असल्याचे पुरावे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील रासायनिक घटक हे यामागील प्रमुख कारण असले तरी प्राण्यांमधील जननक्षमतेवर पर्यावरण बदलाचाही (environmental change) मोठा परिणाम होत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. (The impact of environmental change on animal fertility is one of the reasons behind the extinction of species)

तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास, उष्णता सहन न झाल्याने प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, अशा प्रकारच्या तापमानात काही प्रजातींमधील नरांमधील जननक्षमता कमी होत असल्याचे आमच्या संशोधनातून दिसून आल्याचे मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले. त्यामुळे प्रजातींचे अस्तित्व हे ते कोणत्या तापमानात टिकून राहतात यापेक्षा कोणत्या वातावरणात ते पुनरुत्पादन करू शकतात, यावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. हा शोध अत्यंत महत्त्वाचा असून प्रजाती नष्ट होण्यामागे तापमान हे एक कारण असू शकते. तसेच, पर्यावरण बदलाचा प्राण्यांवर होणाऱ्या परिणामांबाबतही अधिक अभ्यास आवश्‍यक असल्याचे यामुळे दिसून येत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

तापमानवाढीमुळे काही किटकांमधील आणि मधमाश्‍यांच्या काही प्रजातीमधील जननक्षमता नष्ट झाल्याची उदाहरणेही संशोधकांनी दिली. तसेच, गोवंशीय जनावरे, डुक्कर, मासे आणि पक्ष्यांमध्येही तापमानवाढीमुळे जननक्षमता कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या तापमानवाढीचा जैववैविध्यावर कसा परिणाम होतो, यावर संशोधकांकडून अभ्यास केला जात आहे.

घरमाश्‍यांवर प्रयोग

घरमाश्‍यांच्या ४३ प्रजातींवर अभ्यास करून ब्रिटन, स्वीडन आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी एक अहवाल आज प्रसिद्ध केला. या प्रजातींमधील नर माश्‍यांना वेगवेगळ्या तापमानाखाली चार तास ठेवण्यात आले. अधिक तापमानात जननक्षमता कमी होत असल्याचे यावेळी आढळून आले. अधिक तापमानामुळे ४३ पैकी ११ प्रजातींची ८० टक्के जननक्षमता कमी झाल्याचे दिसून आले. या अभ्यासाचा आधार घेऊन या मुद्द्यावर अधिक प्रमाणात संशोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, तब्येतीची केली विचारपूस, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर काँग्रेसची टीका

दररोज 18 तास उपवास ठेवतो हा अरबपति, कारण जाणून आश्चर्यचकीत व्हाल

अभिनेत्रीने मेकअपरूममधून बाहेर काढल्यावर रडत बसलेल्या उषा नाईक; मोहन गोखेलेंनी थेट बॅग उचलली अन्

Marriage Conditions : अटी-शर्तींवर पुन्हा फुलतोय संसार; वाद झाल्यानंतर काही नियम ठरवून जोडपी येताहेत एकत्र

SCROLL FOR NEXT