Bangladesh  sakal
ग्लोबल

Bangladesh : लुटमारीच्या भीतीने उडाली झोप ; राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत सशस्त्र टोळ्यांचा धुडगूस

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राजकीय अस्‍थिरता निर्माण झालेल्या बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लूटमार आणि दरोड्याच्या घटनांमुळे बांगलादेशातील अनेक नागरिकांची झोप उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

ढाका : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राजकीय अस्‍थिरता निर्माण झालेल्या बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लूटमार आणि दरोड्याच्या घटनांमुळे बांगलादेशातील अनेक नागरिकांची झोप उडाली आहे.

‘‘काल रात्री काही गुंडांच्या सशस्त्र टोळ्यांनी आमच्या शेजारच्या घरावर हल्ला केला. त्यांनी तेथे धुडगूस घातला आणि घरातील दागिने आणि पैसे लुटले’’ अशी माहिती येथील नवोदय हाउसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने स्थानिक माध्यमांना गुरुवारी दिली.

बांगलादेशातील अनेक ठिकाणी लूटमारीच्या घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या लूटमारीच्या घटनांमुळेच येथे रात्रीच्यावेळी नागरिक गटागटाने गस्त घालत आहेत. लूटमार आणि दरोड्याच्या भीतीने गेले काही दिवस आम्ही रात्रीचे झोपू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया ढाक्यातील उत्तरा आणि मोहम्मदपूरा येथील अनेक नागरिकांनी दिली आहे.

लुटीचे व्हीडिओ व्हायरल

समाजमाध्यमांत विविध ठिकाणच्या लूटमारीची अनेक दृश्‍ये येथील नागरिकांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहेत. ‘‘मंगळवारी रात्री मोहम्मदपूरा परिसरात शस्त्रधारी गुंडानी येथे दहशत माजवली होती. येथील मशिदींमधून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.’’ अशी माहिती विद्यापीठात काम करणारे शिक्षक नझवी इस्लाम यांनी दिली.

रहिवाशांकडून गस्त

बुधवारी रात्री मोहम्मदपूरा परिसरातील नागरिकांनी रात्रभर या परिसरात गस्त घातली. यावेळी येथील मदरशांमधील काही विद्यार्थ्यांनीदेखील गटागटाने येथील रहिवाशांबरोबर गस्त घातली, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली.

‘एटीएम’ रिकामे

बांगलादेशातील बहुतांश ठिकाणच्या ‘एटीएम’ मशिनमध्ये पैसे संपले असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहेत. त्याचप्रमाणे येथील बँकांमध्येही रोकड कमी असल्याचे काही बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुबाली बँकेचे व्यवस्थापकीय संचालक महम्मद अली म्हणाले की, हिंसाचारामुळे येथील बँकांमध्ये आणि एटीएममध्ये रोकड वितरित करणे अशक्य झाल्याने ही चणचण भासत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT