यूरोप तसेच आफ्रिकन देशात जो कोरोनाचा (corona new variant) उद्रेक झालाय त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येतेय. कारण फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, पोर्तूगाल, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) धडकलीय. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने या ठिकाणी धुमाकुळ घातला असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. त्याबाबत शास्त्रज्ञांनी या पूर्वीच धोक्याची घंटा वाजविली होती.
नवा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे रिपोर्ट
एक नवीन, संभाव्यतः कोरोनाव्हायरसचा प्रकार, जो वेगाने पसरत आहे. त्याबाबत शास्त्रज्ञांनी धोक्याची घंटा वाजविली होती. अनेक देशांत प्रवास बंदी लादण्यात आल्या असून आर्थिक बाजारपेठा डबघाईला येत आहेत, कारण जगाला साथीच्या आजारावरून आणखी एक धक्का बसण्याची भीती होती. याच उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी आणीबाणी जाहीर केलीय तर काहींनी शाळा, ऑफिसेस पुन्हा एकदा बंद केलीत. आफ्रिकेतल्या सहा देशातून येणाऱ्या विमानांवरही बंदी घालण्यात आलीय. B.1.1.529 असं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे हा नवा व्हेरिएंटनं त्या देशात धूमाकुळ घातलाय जिथं लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच कोरोनाच्या व्हेरिएंटला रोखण्यात लस अपयशी ठरतेय.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी गटाच्या शास्त्रज्ञांनी पूर्ण दिवसाच्या पुनरावलोकनानंतर नवीन स्ट्रेनला “चिंताजनक प्रकार” घोषित केले आणि त्याला ग्रीक अक्षरात “ओमिक्रॉन” असे नाव दिले. या प्रकारात मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन आहेत, त्यापैकी काही ओमिक्रॉनशी संबंधित आहेत," डब्ल्यूएचओने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे. "प्राथमिक पुरावे इतर प्रकारांच्या तुलनेत या संसर्गाचा पुन्हा होण्याचा धोका होण्याची शक्यता आहे. तरीही, व्हेरियंटच्या संक्रमणक्षमतेबद्दल मुख्य प्रश्न शिल्लक आहेत, ते लोकांना आजारी बनवू शकते का आणि ते लस टाळण्यास सक्षम होऊ शकते का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
सर्व रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं बाधित
कोरोनाच्या नव्या लाटेनं फ्रान्स, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पोर्तूगाल, झेक रिपब्लिक ह्या देशांना कवेत घ्यायला सुरुवात केलीय. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण हे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं बाधित आहेत. फ्रान्समध्ये एका दिवसात 33 हजार 464 नवे रुग्ण सापडलेत. एप्रिलनंतर एवढे रुग्ण एकाच दिवसात सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दक्षिण आफ्रिकेत 2 हजार 465 नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आकडा 321 टक्क्यांनी अधिक आहे. जर्मनीत तर कोरोनानं हाहाकार माजवलाय. तिथं एका दिवसात 75 हजार 565 नवे कोरोना रुग्ण सापडलेत. हा आतापर्यंतचा रूग्ण सापडण्याचा सर्वात मोठा आकडा आहे. अमेरीकेतही कोरोनाचा उद्रेक झालाय. 1 लाख 17 हजार, 666 एवढे नवे रुग्ण सापडलेत. दीड हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 18 दिवसांपासून हा आकडा सातत्यानं वाढतो आहे. बेल्जियममध्ये कोरोनाचे 23 हजार 350 नवे रुग्ण सापडलेत. ऑक्टोबरनंतरचा हा सर्वात मोठा रुग्ण आकडा आहे.
कोरोनाच्या नव्यानं झालेल्या स्फोटावर इंग्लंड, इस्त्रायलनं 6 आफ्रिकन देशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातलीय. हे देश आहेत दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, नामिबिया, झिम्बाब्वे, लेसोथो, इस्वातिनी, मोझंबिक. नवा कोरोना व्हेरिएंट हा लसीकरणाच्या प्रोग्रामलाच धोका असल्याचं मत इंग्लंडनं व्यक्त केलंय. झेक रिपब्लिकनं आणीबाणीची घोषणा केलीय तर पोर्तुगालनं नैसर्गिक आपत्ती जाहीर केलीय. त्या पार्श्वभूमीवर नवी बंधनं घालण्यात आलीयत. त्यात मास्क पुन्हा अनिवार्य करण्यात आलाय. ख्रिसमसच्यापुर्वी टेस्टिंग सांगण्यात आलीय तर काही जागांसाठी पास अनिवार्य केला गेलाय. विशेष म्हणजे पोर्तुगाल हा जगातल्या सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांपैकी एक आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.