Russia Ukraine War Sakal
ग्लोबल

Russia Ukraine War: रशियाविरोधात युद्ध लढताहेत ३ भारतीय तरुण; युक्रेनमध्ये विद्यार्थी म्हणून गेले, अन्

सकाळ डिजिटल टीम

Indians in Russia Ukraine War:युक्रेन आणि रशियामधील सुरु असलेल्या युद्धाला एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटून गेलाय. मात्र, या युद्धाचा निकाल अद्याप लागू शकला नाही. अशातच, युक्रेनचे सामान्य नागरिक लष्कराच्या जवानांसोबत खांद्याला खांदा लावून युद्धात रशियाच्या सैन्याचा सामना करत आहेत. युक्रेनमध्ये घुसून रशियाच्या सैन्याने विध्वंस केलाय.

अनेक वेळा युक्रेननेही रशियावर क्षेपणास्त्राने हल्ले चढवले. रशियाने युक्रेनचा मोठ्या भूभागावर ताबा मिळवला. रशिया विरुद्धच्या युद्धात फक्त युक्रेनचे तरुण-तरुणीच नव्हे तर, काही भारतीय देखील व्लादिमीर पुतीनच्या सेनेच्या विरोधात सशस्त्र मोर्चा सांभाळत आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच भारतीयांची गोष्ट सांगणार आहोत, जे रशिया विरोधात युक्रेनच्या बाजूने लढत आहेत. त्यांच्यासाठी हे युद्ध आपलं घर वाचवण्याची लढाई बनलीये. हे भारतीय युक्रेनच्या आंतरराष्ट्रीय रक्षा सेनेसोबत लढत आहेत. हे तीन भारतीय रशियाच्या ताब्यात असलेल्या बखुमतजवळील एका अभियानावर आहेत.

या भारतीयांनी 'द वीक'या माध्यमांशी कोस्त्यन्तिनिव्का शहरामध्ये संवाद साधला. हे मध्यवर्ती शहराची लोकसंख्या १८००० इतकी होती. येथील रस्त्यांवर रणगाड्यांच्या साखळ्यांचे चिन्ह स्पष्ट दिसत होते. आताही या शहरामध्ये स्फोटांचा आवाज येत असतो.

युक्रेनमधील सैनिकांना आडनाव सांगण्याची परवानगी नाही

या तीन भारतीयांमधील दोघांनी पुढे येऊन संवाद साधला. यामधील एक भारतीय मूळ मध्यप्रदेश आणि दुसरा हरियाणामधील आहे. मध्यप्रदेशमधील एंड्री या युक्रेनच्या सैनिकाने त्याचा चेहरा झाकलेला होता. तर, हरियाणामधील व्यक्तीने आपले नाव नविन असल्याचे सांगितले. एंड्रीने सांगितले की तो २०२२मध्ये युक्रेनच्या सैन्यात सामील झाला होता.(Latest Marathi News)

एंड्री कॅमेऱ्यासमोर बोलू इच्छित नव्हता. नविनने त्याचे आडनाव सांगितले नव्हते. कारण, युक्रेनच्या सैनिकांना त्यांचे आडनाव सांगण्याची परवानगी नव्हती. आडनावामुळे तो सैनिक रशियाचा आहे की युक्रेनचा याबाबत त्याची ओळख पटू शकते.

विद्यार्थी म्हणून युक्रेनमध्ये आले आणि इकडेच स्थायिक झाले

दोन्ही सैनिक हिंदी चांगली बोलत होते. ते म्हणाले की, त्यांना भारतीय असण्यावर गर्व आहे. मात्र, ते युक्रेनसाठी लढू इच्छितात. दोघांनी सांगितलं की ते विद्यार्थी म्हणून युक्रेनमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी युक्रेनच्या महिलांशी लग्न केलं. एंड्रीचे मुलेही आहेत. एंड्री १२ वर्षांपासून युक्रेनमध्ये राहतोय.(Latest marathi News)

त्याने विचारलं की जर तुमच्या घरावर कोणी हल्ला केला तर, तुम्ही लढणार की तमाशा बघत बसणार ? तो म्हणाला की रशियन सैनिक युक्रेनच्या लोकांना मारत आहेत. ते अशा ठिकाणी देखील हल्ले केले,ज्या ठिकाणी युक्रेनचं लष्कर नाही. अनेक ठिकाणी रशियन सैनिकांनी महिलांचा बलात्कार त्यांच्या नवऱ्यासमोर केलाय. ते जनावरापेक्षाही वाईट आहेत. त्यांना युक्रेन सोडावं लागेल.

मध्येप्रदेशमधील नविन यावर्षीचं सेनेत झाला सामील

हरियाणातीचा नविन म्हणाला की, रशिया सोव्हिएट काळातील उरलेल्या रॉकेटने युक्रेनवर हल्ला करतोय. त्याचं सांगणं आहे की आमने-सामनेच्या लढाईत युक्रेन रशियाचा पराभव करेल.

खार्किव एविएशन इंस्टिट्युटमधून शिक्षण पुर्ण केल्यावर नविन सर्वात आधी प्रादेशिक संरक्षण दलात सामील झाला. तो जानेवारी २०२३मध्ये सैन्यात सामील झाला. त्याला फ्रंटलाईन पोस्टिंगआधी सहा आठवडे फ्रेंच,जर्मन आणि इज्राईली प्रशिक्षकांनी ट्रेनिंग दिली. सुरुवातीला त्याला युद्धाची भीती वाटायची, पण त्याचा कमांडर एलेक्सने वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत केली.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

Latest Marathi News Updates : विनोद तावडेंच्या नेतृत्वात भाजपचा नवा विक्रम

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

SCROLL FOR NEXT