हमासने ओलिस ठेवलेले तीन इस्रायली नागरिक १५ डिसेंबर रोजी इस्राईलच्याच सैनिकांकडून चुकीने मारले गेले होते. या घटनेचा तपास अहवाल गुरुवारी इस्त्राईलच्या सैन्यदलाने प्रकाशित केला.
अहवालातील माहितीनुसार हत्येच्या काही दिवस आधी इस्त्रायली सैनिक गाझातील इमारतीवर हल्ला करत असताना ओलिसांच्या जवळ आले होते. ते मदतीसाठी आरडाओरड करीत होते; पण हमासच्या दहशतवाद्यांनी फसविण्यासाठी हा बनाव रचल्याचे समजुतीतून इस्त्रायली सैनिकांनी ओलिसांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित इमारतीत स्फोटके ठेवल्याच्या शक्यतेतून सैनिक तेथून बाहेर पडले.
इस्त्रायली सैन्यदलाच्या तपासानुसार, ओलिसांनी इमारतीतून पलायन केले असावे व त्यांच्यापासून धोका असल्याच्या गैरसमजुतीतून १५ डिसेंबरला इस्रायली सैनिकांनी त्यांना चुकून गोळ्या घालून ठार केले. यामध्ये दोन ओलिसांचा जागीच मृत्यू झाला. तिसरा ओलिस पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याची ओळख पटविण्यासाठी गोळीबार न करण्याचा आदेश सैनिकांना देण्यात आला होता. 'मदत करा', 'ते माझ्यावर गोळीबार करीत आहेत,' असे तो सांगत होता. ते ऐकून इस्रायली कमांडरने सैनिकांना त्याच्या दिशेने जाण्याचा आदेश दिला होता. पण रणगाड्याच्या आवाजामुळे दोन सैनिकांना आदेश ऐकू आला नाही आणि त्यांनी ओलिसावर गोळ्या झाडल्या. असे अहवालात म्हटले आहे.
युद्धभूमीवर आतापर्यंत
■ गाझापट्टीमध्ये अद्याप १२९ ओलिस कैदेत
■ उर्वरित ओलिसांची सुरक्षित सुटका करण्यासाठी इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर वाढता दबाव
■ दक्षिण इस्त्राईलवर सात ऑक्टोबर रोजी हल्ला करताना हमासच्या दहशतवाद्यांनी २५० ओलिसांचे अपहरण केले होते
■ इस्त्राईल आणि हमास यांच्यात नोव्हेंबरमध्ये झालेल्या अल्पकालिन शस्त्रसंधीदरम्यान इस्त्रायली तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनींच्या बदल्यात १०० हून अधिक ओलिसांची सुटका करण्यात आली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.