Today is International Museum Day 
ग्लोबल

दिन विशेष: आज जागतिक संग्रहालय दिवस; भारतातील या संग्रहालयाविषयी तुम्हाला नक्कीच माहिती नसेल

रफिक पठाण

पुणे: जगभरात 18 मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1977 सालापासून जगभरात हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय कौन्सिल यांच्यामार्फत जगभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन जागतिक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील देशांचा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत असतो. या कार्यक्रमात अनेक ऐतिहासिक तसेच विचित्र गोष्टींचे सुद्धा प्रदर्शन पाहायला मिळत असते. भारतात सुद्धा अनेक संग्रहालय आहेत परंतु त्यातील काही संग्रहालयांची आपल्याला माहिती सुद्धा नसते. आज आम्ही भारतातील अश्याच आठ थोड्या विचित्र वाटणाऱ्या संग्रहालयाची तुम्हाला माहिती देणार आहोत.

1. लेजेंड मोटरसायकल कॅफे संग्रहालय:
भारताची आयटी राजधानी असलेल्या बँगलोर शहरात लेजेंड मोटरसायकल कॅफे संग्रहालय आहे. या संग्रहालयात 20 पेक्षा अधिक विंटेज दुचाकी वाहने आजही चालू स्थितीत असलेले आपल्याला पाहायला मिळते. हे संग्रहालय दुचाकी वाहनाचे निस्सीम चाहते असणारे एस.प्रभू यांच्या आजपर्यंतच्या कलेक्शन मधून साकार झाले आहे. या संग्रहालयात 1924 सालची दुचाकी पासून ते 1942 च्या जेम्स एमएल व बीएसए एम20 सुद्धा बघायला मिळतात. जर तुम्ही दुचाकी वाहनांचे शौकीन असाल किंवा बँगलोरला येत-जात असाल तर तुम्ही या संग्रहालयाला आवश्य भेट दिली पाहिजे. 

2. पतंग संग्रहालय: 
होय तुम्ही बरोबर वाचलंय पतंग संग्रहालय. गुजरात राज्य संक्रातीतील पतंग महोत्सवासाठी संपूर्ण जगात ओळखले जाते. त्याच गुजरात मधील अहमदाबाद शहरात पतंग संग्रहालय सुद्धा आहे. या पतंग संग्रहालयात 125 पेक्षा अधिक अतिशय दुर्मिळ अश्या पतंग पाहायला मिळतात. या संग्रहालयाची स्थापना हि 1986 साली करण्यात आली. या संग्रहालयाला पतंग प्रेमी श्री. भानूभाई शाह यांनी त्यांच्या कलेक्शन मधील सर्व पतंगी दान म्हणून दिल्या आहेत. वयाच्या 21 व्या  वर्षांपासून त्यांनी या पतंगी जमा करण्यास सुरवात केली होती. 

3. पुरखौती मुक्तांगण:
 पुरखौती मुक्तांगण हे खरतर संपूर्ण छत्तीसगड राज्याच्या संस्कृतीचे संग्रहालय आहे. या संग्रहालयात आपल्याला छत्तीसगड राज्यातील संपूर्ण संस्कृतीचे दर्शन होते. 2006 साली छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी या संग्रहालयाचे मा.राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते. 

4. मानवी मेंदूचे संग्रहालय:
बँगलोरमध्ये 2010 साली विज्ञानाच्या दृष्टीने अति महत्वाचे मानता येईल अश्या या मानवी मेंदूच्या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. या संग्रहालयात काचेच्या बरणीत जतन करून ठेवलेले 400 पेक्षा जास्त मेंदू आपल्याला पाहायला मिळतात. आजार, मार लागून  मेंदूवर परिणाम झालेले अनेक मेंदू या ठिकाणी अभ्यासाच्या हेतूने जतन करून ठेवण्यात आले आहेत. 

5.  मायोंग मध्यवर्ती संग्रहालय:
आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटी शहराच्या अगदी जवळ मायोंग नावाचे छोटेसे शहर आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल कारण ही जागा त्याच्या काळ्या जादूच्या विद्येसाठी कुप्रसिद्ध आहे. आणि त्याहून अधिक आश्चर्याची बाब अशी कि याठिकाणी जगातील एकमेव काळ्या जादूच्या विद्येचे संग्रहालय सुद्धा आहे. या संग्रहालयात अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत ज्याचा प्राचीन लोकांनी काली जादू करण्यासाठी उपयोग केला होता. याठिकाणी असलेल्या लोकांकडून त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविण्यात येते.

6. आंतरराष्ट्रीय सुलभ शौचालय संग्रहालय:
समाजसुधारक डॉ.बिंदेश्वर पाठक यांच्या संकल्पनेतून असे अनोखे आंतरराष्ट्रीय सुलभ शौचालय संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. या संग्रहालयात अति प्राचीन अश्या अनेक शौचालय, तसेच अति महागडे असे शौचालय यांच्याबद्दल माहिती आपल्याला मिळते. प्राचीन काळात कशाप्रकारे त्याची निर्मिती केली होती याचे पुरावे सुद्धा आपल्याला याठिकाणी पाहायला मिळतात. अकराव्या शतकात असलेल्या शौचालयाचा इतिहास याठिकाणी गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो. आजपर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी या अनोख्या संग्रहालयाला भेट दिली आहे. 

7. रिजर्व बँक ऑफ इंडिया संग्रहालय:
भारताचे आर्थिक चक्र फिरवणाऱ्या रिजर्व बँक ऑफ इंडियाचे स्वतःचे अशे संग्रहालय असून या संग्रहालयात मोठ्या प्रमाणात जतन केलेल्या नाणे, चलनी नोटा या आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या संग्रहालयात हस्ताक्षराचे सुद्धा संग्रहालय असून त्यात अनेक दिग्ग्ज लोकांचे हस्ताक्षर आपल्याला पाहायला मिळतात. 

8. सुधा कार संग्रहालय:
आपल्यातील अनेकांना वेगवेगळ्या कारची आवड असते. व त्या पाहायला चालवायला आपल्याला आवडते. सुधा कार संग्रहालय या संग्रहालयाची स्थापना 2010 साली के.सुधाकर यांनी केली. के सुधाकर यांच्या नावावर जगातील सर्वात मोठी तीन चाकी सायकल बनविण्याचा रेकॉर्ड असून त्याची नोंद गिनीज बुकमध्ये सुद्धा आहे. त्यांनी केवळ 20 दिवसात 55 फूट उंच व 20 फूट लांब इतकी मोठी तीन चाकी सायकल बनविली होती. के. सुधाकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या संग्रहालयात विविध आकाराच्या कार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये बूट, सॅन्डल, शिवलिंग, हेल्मेट, पर्स, शौचालय इत्यादी आकाराच्या कार आपल्याला पाहायला मिळतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Sharad Pawar: ''...म्हणून झारखंडची निवडणूक महाराष्ट्रासोबत घेतली'' शरद पवारांनी सांगितलं भाजपच्या विजयामागचं गुपित

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

SCROLL FOR NEXT