Trilateral Highway Kolkata to Bangkok eSakal
ग्लोबल

Trilateral Highway : आता गाडीने थेट जा थायलंड-बँकॉकला; भारतापर्यंत येणार हायवे!

याचा थायलंडमधील भाग बांधून तयार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sudesh

भारतातून थायलंड किंवा बँकॉकला जाण्यासाठी आता थेट महामार्ग तयार होणार आहे. येत्या चार वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत-म्यानमार-थायलंड अशा तीन देशांमधून हा हायवे जाईल.

याचा थायलंडमधील भाग बांधून तयार असल्याची माहिती थायलंडचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री विजावत यांनी दिली. तर, म्यानमारचे वाणिज्यमंत्री औंग नैंग ओ यांनी सांगितलं की येत्या तीन वर्षात त्यांच्या देशातील भाग बांधून पूर्ण होईल. हा त्रिपक्षीय हायवे (Trilateral Highway) बँकॉकमधून सुरू होईल आणि कोलकातापर्यंत (Bangkok to Kolkata Highway) असेल, असं विजावत यांनी सांगितलं.

२,८०० किमी लांबी

या महामार्गाची लांबी २,८०० किलोमीटर पेक्षा जास्त असणार आहे. हा हायवे बँकॉकवरून सुरू होईल, त्यांतर थायलंडमधील सुकोथायस मे सोत या शहरांतून जाईल. पुढे म्यानमारमधील यांगोन, मांडाले, कालेवा, तामू आणि भारतातील मोरेह, कोहिमा, गुवाहाटी, श्रीरामपूर, सिलिगुरी आणि कोलकाता या शहरांमधून हा हायवे (India Myanmar Thailand Highway) जाईल. कोलकातापर्यंतच हा हायवे असणार आहे.

वाजपेयींचा ड्रीम प्रोजेक्ट

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या हायवेची संकल्पना मांडली होती. एप्रिल २००२ मध्ये यासाठी तीन देशांमध्ये बैठक घेऊन याची संमतीही घेतली होती. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (BIMSTEC) या प्रकल्पाअंतर्गत हा महामार्ग तयार करण्यात येत आहे.

हा हायवे तयार झाल्यानंतर तीन देशांमधील व्यापार आणि दळणवळण वाढणार आहे. याचा हे तीन आणि शेजारील इतर आशियाई देशांना भरपूर फायदा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT