Turkey Earthquake updates turkiye suffering tremors earthquake death toll rising  
ग्लोबल

Turkey Syria Earthquake : तुर्कीला आतापर्यंत बसलेत 435 झटके! मृतांची संख्या 8 हजारांच्या पुढे

सकाळ डिजिटल टीम

Turkey Syria Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत एकूण 8000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक इमारती पत्त्याच्या घरासारख्या कोसळल्या आहेत.

तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, 6 फेब्रुवारी रोजी कहरामनमाराश परिसरात झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपानंतर आतापर्यंत एकूण 435 भूकंपांची नोंद झाली आहे.भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्यासाठी आतापर्यंत एकूण 60,217 कर्मचारी आणि 4,746 वाहने आणि बांधकाम उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार असोसिएटेड प्रेसने तुर्की आणि सीरियामध्ये शक्तिशाली भूकंपांमुळे आतापर्यंत 7,700 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. या व्यापक विध्वंसा दरम्यान मृतांची संख्या वाढतच आहे.

तुर्कस्तानमधील भूकंपानंतर जगभरातील देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे, एकूण 70 देशांचे पथक मदत आणि बचाव कार्यासाठी तुर्कीमध्ये पोहोचले आहे. पण तुर्कस्तानचे खराब हवामान मदत आणि बचावासाठी अडथळा ठरत आहे.

भारताने देखील पाठवली मदत

तुर्कस्तानमधील भूकंपानंतर भारतानेही तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने मदत साहित्य, उपकरणे आणि लष्करी जवानांची चार सी-17 विमाने पाठवली आहेत. यासोबतच 108 टनांपेक्षा जास्त वजनाची मदत पॅकेज तुर्कीला पाठवण्यात आली आहे.

भारताने काय पाठवले?

एनडीआरएफच्या शोध आणि बचाव कार्यात तज्ज्ञांची टीम्स भारतातून तुर्कीला पाठवण्यात आल्या आहेत. त्यांच्यासोबत उपकरणे, वाहने आणि श्वानपथक आणि 100 हून अधिक लष्करी जवान आहेत. भूकंपग्रस्त भागातील लोकांना शोधून त्यांना बाहेर काढण्यासाठी या पथकांना विशेष उपकरणे पाठवण्यात आली आहेत. ज्यांच्या मदतीने रेकेज रेस्क्यू ऑपरेशन्स (CSSR) चालवणे शक्य होणार आहे.

मदत पुरवठ्यामध्ये पॉवर टूल्स, लाइटिंग उपकरणे, एअर-लिफ्टिंग बॅग, चेनसॉ, अँगल कटर, रोटरी रेस्क्यू सॉ इ. याशिवाय बचाव मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षित श्वान पथकही पाठवण्यात आले आहे.

30 खाटांचे फील्ड हॉस्पिटल

फील्ड ऑपरेशनमध्ये 30 बेडची वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी उपकरणे आणि 99 कर्मचारी पाठवण्यात आले आहेत . त्यात विविध क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे. वैद्यकीय उपकरणांमध्ये एक्स-रे मशीन, व्हेंटिलेटर, ऑपरेशन थिएटर, वाहने, रुग्णवाहिका, जनरेटर इ पाठवण्यात आले आहे.

तुर्कस्तानसोबतच भारतानेही C130J विमानाद्वारे भूकंपग्रस्त सीरियात मदत सामग्री पाठवली आहे. यामध्ये 6 टन पेक्षा जास्त मदत सामग्रीचा समावेश आहे ज्यात 3 ट्रक सामान्य आणि संरक्षणात्मक उपकरणे, आपत्कालीन वापरासाठी औषधे, सिरिंज आणि ECG मशीन, मॉनिटर्स आणि इतर आवश्यक वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT