बॉम्ब स्फोटात वडिलांना पाय गमवावा लागला, तर मुलगा हात-पाय नसलेलाच जन्माला आला. मात्र, तरीही चेहऱ्यावर निखळ हास्य..
सीरिया : बॉम्ब स्फोटात वडिलांना पाय गमवावा लागला, तर मुलगा हात-पाय नसलेलाच जन्माला आला. मात्र, तरीही चेहऱ्यावर निखळ हास्य.. हा प्रेरणादायी फोटो तुर्कीचे फोटोग्राफर मेहमत असलन (Mehmet Aslan) यांनी टिपलाय. या चित्रात केवळ कोणालातरी भावूक करण्याचीच नाही, तर हरलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्याची ताकद आहे. ह्या फोटोत बाप-मुलाचं प्रेम दाखवण्यात आलंय, जे लाखो संकटातही 'हसत' आहे. या चित्राला वर्षातील 'सर्वोत्कृष्ट फोटो' म्हणून निवडण्यात आलंय.
फोटोग्राफर मेहमत असलन यांनी सीरिया-तुर्की (Syria-Turkey) सीमेवरील हॅटे प्रांतातील रेहनालीत राहणाऱ्या सीरियन निर्वासित पिता-पुत्राचा हा फोटो टिपलाय. बाप आणि मुलगा दोघ अपंग असूनही ते हसतमुख असल्याचं चित्रात दिसतंय. म्हणूनच, सिएना इंटरनॅशनल अॅवॉर्ड्स 2021 मध्ये या चित्राची 'Photo Of The Year' म्हणून निवड करण्यात आलीय.
या चित्रात दिसणाऱ्या वडिलांचा सीरियाच्या बाजारात झालेल्या बॉम्ब स्फोटात पाय तुटला, तर गृहयुद्धादरम्यान गर्भवती पत्नीला विषारी वायूचा संसर्ग झाला, ज्यामुळं मुलगा हातपाय नसलेला जन्माला आला. वडिलांना एक पाय नाही, तर मुलाला दोन्ही हात-पाय नाहीत, तरीही हे दोघ हसतमुख आपलं जीवन जगत आहेत. आणि हाच प्रेरणादायी फोटो असलन यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय.
सीरियात परिस्थिती बिकट
सीरिया गेल्या एक दशकाहून अधिक काळ गृहयुद्धाचा सामना करत आहे. आज जगातील सर्वात मोठं निर्वासित संकट सीरियात आहे. सीरियात 11 वर्षांच्या हिंसक लढाईनं अनेक शहरं उद्ध्वस्त केली. लोकांना घरं सोडून पळ काढावा लागला. या 11 वर्षांत 66 लाख सीरियन निर्वासितांचं जीवन जगत आहेत. तुर्कीमध्ये 36 लाख, लेबनान 8 लाख, जॉर्डन 6 लाख, इराक 2.5 लाख, इजिप्तमध्ये सीरियातून 1 लाख 30 हजार लोकांनी आश्रय घेतलाय. सीरियन युद्ध सुरू झाल्यानंतर लाखो लोकांनी युरोपमध्ये आश्रय मागितला. अनेक देशांनी हजारो लोकांना आश्रयही दिला. मात्र, दशकानंतरही या लोकांना निर्वासित छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.