ट्विटर आणि मस्कचा व्यवहार पूर्ण होणार की नाही याबाबत प्रचंड गोंधळ आणि शंका होत्या.
Elon Musk Twitter Deal : ट्विटर आणि मस्कचा व्यवहार पूर्ण होणार की नाही याबाबत प्रचंड गोंधळ आणि शंका होत्या. आता हा करार पूर्ण होत ट्विटरचा ताबा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांच्याकडं आला आहे. इलॉन मस्क यांनी आता पूर्णपणे ट्विटरची मालकी घेतलीय.
त्यानंतर लगेचच इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेशही दिल्याचं वृत्त आहे. या प्रक्रियेदरम्यान कंपनीतून काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यास त्यांनी व्यवस्थापनाला सांगितलंय. यासोबतच मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरच्या धोरणांमध्ये बदल करण्यास सांगण्यात आलंय.
इलॉन मस्क यांनी पदभार स्वीकारताच मायक्रो ब्लॉगिंग साइटचे सीएफओ, सीईओ आणि पॉलिसी चीफ यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (Parag Agarwal) आणि वित्त प्रमुख नेड सेहगल यांनी कंपनीचे सॅन फ्रान्सिस्को मुख्यालय सोडलं आहे. शिवाय, मस्क यांनी ट्विटरसाठी कंटेंट मॉडरेशन कौन्सिल (Content Moderation Council) तयार करण्याची घोषणा केलीय.
इलॉन मस्क यांनी हे देखील स्पष्ट केलंय की, कौन्सिलच्या बैठकीपूर्वी सामग्रीशी संबंधित किंवा प्रतिबंधित खाती पुनर्स्थापित करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. या परिषदेच्या आढावानंतरच बंद खाती पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला जाईल. मस्क यांनी ट्विटरचं US $ 44 अब्ज अधिग्रहण पूर्ण केल्यानंतर काही तासांतच ट्विट केलं की, 'अच्छे दिन' पुढं आहेत. तसंच चीफ ट्विट असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय. याशिवाय, त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत आनंदही व्यक्त केलाय. ट्विटरचं म्हणणं आहे की, त्यांचे दररोज 238 दशलक्ष वापरकर्ते आहेत. अनेक कंपन्या, राजकारणी, पत्रकार आणि इतर सार्वजनिक व्यक्तींसाठी ट्विटर हे आवडतं व्यासपीठ आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.