Russo-Ukrainian War sakal
ग्लोबल

Russo-Ukrainian War : जगावर परिणाम करणारे युद्ध ; युक्रेन-रशियातील संघर्षाला दोन वर्षे पूर्ण

युक्रेन हा आमच्याच देशाचा एक भाग आहे आणि युक्रेनमध्ये स्वायत्ततेची मागणी करणाऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ले करण्याचे आदेश दिले, त्या घटनेला उद्या (ता. २४) दोन वर्षे पूर्ण होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

किव्ह (पीटीआय) : युक्रेन हा आमच्याच देशाचा एक भाग आहे आणि युक्रेनमध्ये स्वायत्ततेची मागणी करणाऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ले करण्याचे आदेश दिले, त्या घटनेला उद्या (ता. २४) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. हे युद्ध अद्यापही सुरू असून यामध्ये प्रचंड जीवित आणि वित्त हानी होण्याबरोबरच जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था, व्यापार आणि अन्नधान्य पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

रशियाने २०१४ मध्ये युक्रेनकडील क्रिमिया या बेटाचा बळजबरीने ताबा घेतला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये सीमेवर सैन्याची जमवाजमव करत २४ फेब्रुवारीला हवाई हल्ले सुरू करत युक्रेनच्या सीमेत सैन्य घुसविले. सध्याच्या स्थितीत युक्रेनचा पूर्वेकडील जवळपास एक चतुर्थांश भाग रशियाच्या ताब्यात आहे. सुमारे एक हजार किलोमीटरच्या युद्धसीमेवर दोन्ही देशांचे सैनिक तैनात असून एकमेकांवर हल्लेही करत आहेत. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी प्रसंगी युद्धआघाडीवर जाऊनही देशाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी जगभरात फिरून युक्रेनसाठी मदत मिळविली आहे. प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपकडून मिळणाऱ्या शस्त्रपुरवठ्याच्या आधारावर युक्रेन युद्धात टिकून आहे. दुसरीकडे, शेकडो निर्बंध लादले जाऊनही युक्रेनचा ताबा सोडण्यास रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन तयार नाहीत. या युद्धात शस्त्रांचा प्रचंड वापर झाला असून लाखो लोकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाला आहे. जगभरात अन्नधान्याच्या किमती वाढल्या, ऊर्जा महाग झाली. या युद्धात अब्जावधी डॉलरची वित्तहानी झाली आहे.

युक्रेनला मिळालेला शस्त्रसाठा

आतापर्यंत युक्रेनला ५० हून अधिक देशांनी शस्त्रास्त्रांची मदत केली आहे. यामध्ये १० दीर्घ पल्ल्याच्या रॉकेट यंत्रणा, १७८ दीर्घ पल्ल्याच्या तोफा व एक लाख तोफगोळे, ३५९ रणगाडे, अडीच लाख रणगाडाभेदी सुरुंग, ६२९ लष्करी वाहने, आठ हजार २१४ लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ८८ ड्रोन

युद्धातील प्रमुख घडामोडी

२०२२

  • २४ फेब्रुवारी : रशियाचे युक्रेनमध्ये हल्ले सुरू

  • २८ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय बाजारात रशियाचे चलन कोसळले

  • मार्च : युक्रेनमधील सर्व प्रमुख शहरांवर तुफान हवाई हल्ले

  • एप्रिल : काही ठिकाणांहून सैन्यमाघारी, सामूहिक हत्याकांड केल्याच्या घटना उघडकीस, सर्व शांतता चर्चा निष्फळ

  • जून-सप्टेंबर : अनेक शहरांमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांची समोरासमोरची लढाई, झॅपोरिझ्झिया अणुप्रकल्पावरील ताब्यासाठी अनेक दिवस चकमक

  • सप्टेंबर : रशियाने तीन लाख राखीव सैन्य सीमेवर आणत युद्धाची तीव्रता वाढविली; ताब्यात घेतलेल्या पूर्वेकडील भागात रशियाकडून सार्वमत

  • ऑक्टोबर : क्रिमिया-युक्रेनला जोडणाऱ्या पुलावर युक्रेनचे हल्ले

२०२३

  • जानेवारी : अमेरिका आणि युरोपकडून युक्रेनला शस्त्रमदतीचा ओघ वाढला

  • फेब्रुवारी : अमेरिकेच्या अध्यक्षांची युक्रेनला भेट

  • जून : युक्रेनकडून प्रतिआक्रमणाला सुरुवात

  • जून : रशियातील खासगी सैन्याचे बंड

  • जुलै : धान्यनिर्यात करारातून रशियाची माघार

  • ऑगस्ट : खासगी सैन्याचा प्रमुख प्रिगोझिनचा विमान अपघातात मृत्यू

२०२४

जानेवारी-फेब्रुवारी : पूर्वेकडील युद्धसीमेवर चकमकी सुरू, प्रमुख शहरांमध्ये रशियाचे हल्ले सुरूच, युक्रेनचेही मॉस्कोपर्यंत ड्रोन हल्ले

युद्धाचे प्रमुख परिणाम

युक्रेन

  • अनेक शहरे पूर्णपणे उद्‌ध्वस्त

  • उद्योग बंद पडल्याने अर्थव्यवस्था कोलमडली

  • देशाच्या पूर्वेकडील भाग रशियाच्या ताब्यात

  • धान्य निर्यातीला फटका बसल्याने युक्रेनचे व इतर देशांचेही नुकसान

  • हजारो लोक विस्थापित

  • हजारो जणांचे रोजगार गेले

  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

रशिया

  • देशाच्या पश्‍चिमेकडील भागात हल्ल्यांमुळे नुकसान

  • अमेरिकेसह अनेक देशांचे आर्थिक व लष्करी निर्बंध

  • अनेक उद्योग व आयात-निर्यातीवर परिणाम

  • कर्जाचा डोंगर

  • युक्रेनच्या बाजूने असलेले प्रमुख देश

    अमेरिका, ब्रिटनसह युरोप, ऑस्ट्रेलिया,

    जपान व नाटो संघटना

    १, ०७, ०००

    सैनिक व नागरिकांचा मृत्यू

    २,१४,०००

    जखमी

हानी

१०,३३८

नागरिकांचा मृत्यू

११,०००

बेपत्ता

१९,६३२

जखमी

४२,१५२ सैनिकांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT