मुंबई: युनायटेड किंगडमने शुक्रवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जगभरात लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचे (corona vaccine) डोस देण्याबाबत चाचण्या सुरु आहेत. यामध्ये युनायटेड किंगडमने (UK) आघाडी घेतली आहे. (UK approves Pfizer BioNTech Covid-19 vaccine for 12 to 15-year-old kids)
यूकेने १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझर/बायोनटेक लसीचे डोस द्यायला परवानगी दिली आहे. मार्च महिन्यात फायझर आणि त्यांची जर्मन भागीदार कंपनी बायोनटेकने १२ वर्ष वयोगटाच्या आतील मुलांवर फायझरच्या लसीची चाचणी सुरु केली होती.
अमेरिकन नियामकाने डिसेंबर अखेरीस १६ वर्ष व त्यापुढील वयोगटाला फायझर/बायोनटेक लसीचे डोस द्यायला मंजुरी दिली होती. फायझरची लस लवकरच भारतातही येणार आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यात ही लस मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली आहे. MRNA टेक्निकने या लसीची निर्मिती करण्यात आली होती.
आमची लस घेतल्यानंतर १२ वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांचं रक्षण होतं, असे अमेरिकन औषध कंपनी मॉर्डनाने मे महिन्यात म्हटलं होतं. त्याच महिन्यात अमेरिका आणि कॅनडाने १२ आणि त्यापुढील वयोगटासाठी फायझरच्या लसीला मान्यता दिली होती. अमेरिका, युके, युरोप, कॅनडा, सिंगापूर आणि दक्षिण कोरियासह जगातील ५० देशांमध्ये MRNA लसी वापरण्याला मान्यता देण्यात आली आहे. फायझरनेही केंद्राबरोबरच चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतात लस उपलब्ध करुन देण्यासाठी फायझरची केंद्राबरोबर बोलणी सुरु आहेत. पण त्यांना काही सवलती हव्या आहेत. फायझरने वर्षअखेर पर्यंत २.५ अब्ज कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.