britain 
ग्लोबल

ब्रिटनमध्ये जूलैनंतर पहिल्यांदाच एकही मृत्यू नाही

कार्तिक पुजारी

गेल्या जवळपास दीड वर्षांपासून जगभरात कोरोना महामारी थैमान घालत आहे. अशात काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे.

नवी दिल्ली- गेल्या जवळपास दीड वर्षांपासून जगभरात कोरोना महामारी थैमान घालत आहे. अशात काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे. भारतासारख्या देशात कोरोनाची दुसरी लाट असून दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. अशात जगात असेही काही देश आहेत ज्यांनी कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवले आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन देशांनी हे यश मिळवलं आहे. ब्रिटनचा या देशांमध्ये समावेश होतो. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये मंगळवारी एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे ब्रिटनला कोरोना विरोधातल्या लढ्याला यश मिळताना दिसत आहे. (UK britain Reports Zero Daily COVID Deaths For The First Time Since July)

मंगळवारी ब्रिटनमध्ये एकाही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही. विशेष म्हणजे जूलैनंतर पहिल्यांदाच असं घडत आहे. 2020 वर्षाच्या सुरुवातील कोरोना विषाणूने ब्रिटनमध्ये अक्षरश: हाहाकार माजवला होता. हजारो लोकांचा मृत्यू होत होता. पण, ब्रिटन सध्या विषाणूवर नियंत्रण मिळवता दिसत आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महामारी सुरु झाल्यानंतर 28 दिवसांमध्ये 1 लाखांपेक्षा अधिकांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यूरोपमधील कोरोनाने सर्वाधिक प्रभावित देश ब्रिटन ठरला होता.

Britain

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 45 लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी देशात केवळ एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, त्यानंतर मंगळवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे नक्कीच ही एक समाधानाची बातमी आहे. याआधी 30 जूलैला ब्रिटनमध्ये एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक म्हणाले की, नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे. डिसेंबर महिन्यापासून लसीकरण करण्याच्या निर्णयाला यश मिळताना दिसत आहे. असे असले तरी त्यांनी खबरदारी घेण्यास सांगितलं आह

आपण अजून विषाणूला हरवलं नाही. त्यामुळे लोकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असं मॅट हॅनकॉक म्हणाले. दरम्यान, ब्रिटनने अर्थव्यवस्था अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. लवकर लसीकरण सुरु करण्याचे चांगले परिणाम देशाला मिळत आहेत. आतापर्यंत 2.5 लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस मिळाले आहेत. असे असले तरी भारतात आढललेल्या डेल्टा व्हॅरिएंटमुळे ब्रिटनमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT