UK election results Labour Party emerges victorious Rishi Sunak loses elections to Keir Starmer  
ग्लोबल

UK Election Results : ब्रिटनमध्ये चौदा वर्षांनी सत्तांतर! हुजूर गेले, मजूर आले, सुनक यांचा पराभव

सकाळ वृत्तसेवा

लंडन : ब्रिटिश राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाचे आश्वासन देत सर्वांगीण बदलाचा पुरस्कार करणाऱ्या मजूर पक्षाने (लेबर पार्टी) संसदीय निवडणुकीत सर्वोच्च नेते केईर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली आज ब्रिटनची सत्ता काबीज केली. येथे तब्बल चौदा वर्षांनी हा पक्ष सत्तेत आला असून मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला (कंझर्व्हेटिव्ह पार्टी) पराभवाचे तोंड पाहावे लागले. सुनक यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नेतेपदाचा राजीनामा देऊ केला आहे.

या विजयानंतर स्टार्मर (वय ६१) यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन राजे चार्ल्स (तृतीय) यांची भेट घेतली. ते आता ‘१० डाउनिंग स्ट्रीट’ची सूत्रे हाती घेतील. संसदीय निवडणुकीत मजूर पक्षाने ६५० जागांपैकी ४०० पेक्षा अधिक जागांवर विजय प्राप्त केला असून हा पक्ष बहुमताजवळ पोचला आहे. हुजूर पक्षाला मात्र १२१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. लंडनमध्ये केलेल्या विजयी भाषणात स्टार्मर यांनी बदलाला सुरूवात झाली असून आता मला खरोखरच आनंद होतो आहे असे नमूद केले. ‘‘ हे एवढे मोठे बहुमत एक मोठी जबाबदारी घेऊन येत असते. देशाला एकसंध ठेवणाऱ्या संकल्पनांचे पुनरुज्जीवन करायला हवे. हे राष्ट्रीय पुनरुज्जीवन आहे. तुम्ही कुणीही असा, कोठेही असा, नियमाने काम केल्यास हा देश प्रत्येकाला योग्य संधी देईल,’’ असे स्टार्मर यांनी सांगितले. ऋषी सुनक हे उत्तर इंग्लंडमधील रिचमंड आणि नॉर्थॲलर्टन येथून २३ हजार ०५९ मतांनी विजयी झाले पण त्यांच्या पक्षाला मात्र पराभूत व्हावे लागले.

भारताला काय?


जम्मू- काश्मीरच्या मुद्यावरून मजूर पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे या पक्षाचे भारतासोबतचे संबंध बिघडले होते. आता ते पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान स्टार्मर यांच्यासमोर असेल. मुक्त व्यापार कराराबाबत दोन्ही देशांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे पण त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. स्टार्मर यावर निर्णायक पावले टाकतील अशी अपेक्षा आहे.

पक्षीय बलाबल
६५०
एकूण जागा
........
३२६
बहुमतासाठी
.........
४१२ (+ २१४)
मजूर पक्ष
..........
१२१ (-२५१)
हुजूर पक्ष
........
७१ (+६३)
लिबरल डेमोक्रॅटिक
........
९ (-३७)
स्कॉटिश नॅशनल पार्टी
.......
७ (+०)
सिन फेईन (डावा कॅथलिक पक्ष)
......
२८ (+११)
अन्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT