ग्लोबल

UK Election Results : ब्रिटनमध्ये सत्ताबदल! पुढचे पंतप्रधान होण्यासाठी तयार असलेले कीर स्टार्मर कोण आहेत? भारताबद्दल त्यांचं मत काय?

संतोष कानडे

Rishi Sunak News : ब्रिटनमध्ये दहा वर्षांची सत्ता उलथवून लावत कामगार पक्ष सत्तेत येत आहे. एक्झिट पोलने गुरुवारी यासंदर्भात बऱ्यापैकी बिनचूक अंदाज वर्तवला होता. शुक्रवारी हाती येत असलेल्या निकालानुसार लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान होतील, असं दिसून येतंय.

कोण आहेत कीर स्टार्मर?

६१ वर्षीय कीर स्टार्मर यांना ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ यांनी कायदा आणि गुन्हेगारी न्याय या क्षेत्रातील कामासाठी विशेष पुरस्कार दिला होता. त्यांनी २०१५ मध्ये लंडनमधून पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. ते पेशाने वकील आहेत. स्टार्मर यांना दोन मुलं आहेत, त्यांची पत्नी व्हिक्टोरिया ही राष्ट्रीय आरोग्य सेवेत कर्मचारी आहे.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाची निराशाजनक कामगिरी होती. त्यानंतर आज जे पक्षाला यश मिळतंय, त्याचं सगळं श्रेय कीर स्टार्मर यांना जातं. विशेष म्हणजे भारतातल्या काश्मीर प्रश्नावर पक्षाचे माजी नेते जेरेमी कॉर्बिन यांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे नाराज झालेल्या भारतीयांची मन वळवण्यात स्टार्मर यांना यश आलं.

त्यामुळेच मागच्या वर्षी त्यांनी एका भाषणात भारतासोबत जागतिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षेच्या आधारावर संबंध मजबुत करण्याची मागणी केली होती. स्टार्मर यांच्या जाहीरनाम्यातही भारतासोबत नवीन धोरणात्मक भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त करत सुरक्षा, शिक्षण, तंत्रज्ञान या विषयात सहकार्य वाढवण्याचं आश्वासन दिलेलं आहे.

त्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर लंडन येथील श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली होती. ब्रिटनमधल्या हिंदू समूदायाला आश्वासन देत हिंदूफोबियाला स्थान दिले जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.

स्टार्मर यांची आई नर्स होती तर वडील टूलमेकर होते. ब्रिटमधल्या ऑक्स्टेडमध्ये ते लहानाचे मोठे झाले. २०१५ मध्ये आई जोसेफिन यांचं निधन झालं. तेव्हा कीर हे खासदार होते. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये स्टार्मर यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. आज कीर हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

दरम्यान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची कंझर्व्हेटिव्ह पार्टी गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत आहे. पण, यावेळी त्यांची सत्ता जात आहे. अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, महागाई, स्थलांतर असे काही मुद्दे महत्त्वाचे ठरले. या मुद्द्यांमुळे कंझर्व्हेटिव्ह पार्टीला सत्ता गमावावी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय ऋषी सुनक यांच्या विरोधात पक्षातून अंतर्गत गट तयार झाला होता. त्यामुळे सुनक यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

Today Navratri Colour: नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

NIA Raid : ‘एनआयए’चे देशभर २२ ठिकाणी छापे; संशयास्पद साहित्य जप्त, राज्यामध्येही कारवाई

Narendra Modi : ‘काँग्रेस’चा विचारच परदेशी; वाशीमच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT