UK Elections 
ग्लोबल

UK Elections 2024: ऋषी सुनक यांनी पराभव स्वीकारला! लेबर पार्टी सत्ता स्थापन करणार, कीर स्टार्मर नवे पंतप्रधान

कार्तिक पुजारी

लंडन- ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जवळजवळ समोर आले आहेत. यात लेबर पार्टीचा बहुमताने विजय झाल्याचं स्पष्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर ऋषी सुनक यांनी आपला आणि आपल्या पक्षाचा पराभव मान्य केला आहे. लेबर पार्टीने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये सत्ता बदल होणार असून कीर स्टार्मर नवे पंतप्रधान होतील.

गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लेबर पार्टीला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होताच सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी माध्यमांसमोर येऊन आपल्या पक्षाचा पराभव मान्य केला. पक्षाला विजय मिळवून देता आलं नाही, याबाबत त्यांनी पक्षाची माफी देखील मागितली आहे. विजयी लेबर पार्टीचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

सुनक म्हणाले की, लेबर पार्टीने बहुमताचा आकडा पार केला आहे. मी सर कीर स्टार्मन यांचे विजयाबद्दल अभिनंदन करतो. आता शांततेत सत्ताहस्तांतरण होईल. जनतेने दिलेला कौल मी मान्य करतो. पराभवातून खूप काही शिकायचं आहे. मी पराभवाची पूर्ण जबाबदारी घेतो. पक्षातील नेत्यांनी अहोरात्र प्रयत्न केले होते, पण शेवटी आमचा पराभव झालाय. आम्ही समाजासाठी काम करत राहू. मी पक्षाची माफी मागतो.

ब्रिटनमध्ये एकूण ६५० जागांसाठी निवडणूक झाली होती. बहुमतासाठी ३२६ जागांची आवश्यकता असते. सध्या लेबर पार्टीने ३९२ जागांवर आघाडी घेतली आहे, तर कंझर्व्हेटिव्ह पार्टी १०१ जागावर आघाडीवर आहे. लेबर पार्टी बहुमताचा आकडा सहज पार करत असल्याचं सध्याचं चित्र आहे. एक्झिट पोलमध्ये देखील लेबर पार्टीच्या प्रचंड विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक्झिट पोलनुसारच सध्याचा कल दिसत आहे.

ऋषी सुनक यांनी वेळेआधीच सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कंझर्व्हेटिव्ह पक्षाबाबत ब्रिटनच्या जनतेमध्ये काहीसे नकारात्मक वातावरण होते. त्यामुळे त्यांनी वेळेआधी निवडणुका जाहीर केल्याने त्यांनी ही मोठी रिस्क घेतल्याचं बोललं जात होतं. ऋषी सुनक यांना जनतेने नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solar Storm: गंभीर इशारा! अंतराळात निर्माण होणार भयानक वादळ, पृथ्वीवर धडकण्याची शक्यता; भारतावर किती होईल परिणाम?

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेका

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

SCROLL FOR NEXT