UK Political Crisis Update pm of uk Robert Walpole George Canning Liz Truss sakal
ग्लोबल

UK Political Crisis Update : ब्रिटनच्या औटघटकेच्या पंतप्रधान

गोऱ्यांच्या भूमीत राजकीय संकट: दीड महिन्यातच नेतृत्वबदलाची वेळ

सकाळ वृत्तसेवा

लंडन : ब्रिटनमध्ये वाढत्या राजकीय अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर लिझ ट्रस यांनी आज पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्या ४५ दिवसच पंतप्रधानपदावर राहिल्या. त्यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला होता. ब्रिटनच्या इतिहासात लिझ ट्रस यांचा पंतप्रधानपदाचा कालावधी सर्वात कमी राहिला आहे. यापूर्वी ही नोंद हुजूर पक्षाचे तत्कालीन नेते जॉर्ज कॅनिंग यांच्या नावावर होता. ते १८२७ मध्ये ११८ दिवस या पदावर विराजमान होते. लिझ ट्रस यांनी राजीनामा देण्यापूर्वी अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग आणि गृहमंत्री सूएला ब्रेव्हर्मन यांनी राजीनामा दिला होता. पंतप्रधानपदासाठी प्रचार करत असताना लिझ ट्रस यांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आश्‍वासन दिले होते.

परंतु हेच आश्‍वासन त्यांना अडचणीत आणणारे ठरले. ब्रिटनमधील वाढत्या महागाईवर अंकुश ठेवण्यात त्यांना अपयश आले. ट्रस यांनी दिलेले आश्‍वासन लागू करण्यात अपयशी ठरलेले अर्थमंत्री क्वासी क्वार्टेग यांना काही दिवसांपूर्वीच राजीमाना द्यावा लागला. त्यांच्या कर कपात करण्याच्या निर्णयाने अर्थव्यवस्था घसरल्याचे आरोप होऊ लागले होते. परिणामी नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी क्वार्टेग यांचे सर्व निर्णय मागे घेतले. तरीही ट्रस यांच्या सरकारवरचा दबाव कमी झाला नाही. स्वपक्षातील खासदार देखील ट्रस यांच्या विरोधात गेले. अर्थमंत्र्यांच्या निर्णयाचा बाजारावर विपरित परिणाम झाला. मॉर्गेज रेटमध्ये वेगाने वाढ झाली. स्थिती बिकट होऊ लागल्याने बँक ऑफ इंग्लंडला हस्तक्षेप करावा लागला. तसेच हंगामी अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वी क्वार्टेग यांनी आपल्या अर्थखात्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना पदावरून दूर केले. ब्रिटनच्या धोरणावर जगभरात टीका होऊ लागली. ऋषी सुनक यांनी कर कपातीच्या धोरणावरून ट्रस यांना सावध केले होते. पण त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर ट्रस यांना पायउतार व्हावे लागले.

सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान

सर रॉबर्ट वॉलपोल

२० वर्षे ३१५ दिवस

(३ एप्रिल १७२१ ते

११ फेब्रुवारी १७४२)

ट्रसपूर्वी सर्वांत कमी काळाचे पंतप्रधान

जॉर्ज कॅनिंग

११८ दिवस

(१२ एप्रिल १८२७ ते

८ ऑगस्ट १८२७)

लिझ ट्रस

४५ दिवस

(६ सप्टेंबर २०२२ ते

२० ऑक्टोबर २०२२ )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT