Ukraine First Lady Olena Zelensky Google
ग्लोबल

'...तर जगात कोणतीही जागा सुरक्षित नसेल', झेलेन्स्कींच्या पत्नीचा पत्रातून इशारा

सकाळ डिजिटल टीम

Ukraine First Lady Olena Zelensky Warning Letter : युक्रेन-रशियामध्ये युद्ध (Ukraine Russia War) अद्यापही सुरूच आहे. या युद्धग्रस्त देशातून लाखो लोकांनी पलायन केले असून युक्रेनच्या पहिल्या महिला ओलेना झेलेन्स्की (Olena Zelensky) यांनी माध्यमांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. पुतिन यांना वेळीच रोखले नाहीतर या जगात कोणतीही जागा सुरक्षित राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अण्वस्त्र युद्ध सुरू करण्याची धमकी देणाऱ्या पुतिन यांना वेळीच थांबवायला हवे. नाहीतर या जगात कोणतीही जागा सुरक्षित राहणार नाही, असा इशारा त्यांनी आपल्या पत्रातून दिला आहे. त्या पुढे म्हणतात, ''24 फेब्रवारीला रशियानं आमच्यावर आक्रमण केलं. रशियन रणगाड्यांनी युक्रेनियन सीमा ओलांडली आणि त्यांची विमाने आमच्या हवाई क्षेत्रात घुसली. रशियन क्षेपणास्त्रांनी आमच्यावर हल्ले केले. रशियन सैनिकांनी युक्रेनियन नागरिकांची सामूहिक हत्या केली.''

आम्ही कुठल्याही नागरिकांवर हल्ले केले नाही, असा दावा रशियानं केला होता. मात्र, ओलेना यांनी रशियाच्या दाव्याचं खंडन करत युद्धात मृत्यू झालेल्या मुलांची नावे सांगितली. लहान मुलांचा मृत्यू हे सर्वात भयंकर आणि विनाशकारी आहे, असंही त्या म्हणाल्या. आठ वर्षांच्या चिमुकलीला तिचे आजोबा वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण, रशियानं केलेल्या गोळीबारात तिचा रस्त्यावर मृत्यू झाला. किव्हमधील पोलिनाचा तिच्या पालकांसह गोळीबारात जीव गेला. १४ वर्षांचा आर्सेनी उद्धवस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावली. तिला वाचवता आलं नाही. कारण रशियन सैनिकांमुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकली नाही, असे आरोप त्यांनी पत्रातून केले आहेत.

रशियाने लष्करी आक्रमण अधिक तीव्र केल्यामुळे प्रमुख शहरांमधील निवासी इमारती ढिगाऱ्यात जमा झाल्या. आता आमच्या महिला आणि मुले बॉम्ब शेल्टर आणि तळघरांमध्ये राहतात. किव्ह आणि खारकिव्ह मेट्रो स्थानकावर लोक खाली झोपतात. तुमच्यासाठी हे युद्धाचे परिणाम असतील. पण, युक्रेनियन लोकांसाठी एक भयानक वास्तव आहे, असंही ओलेना त्यांच्या पत्रात म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT