Indian Student Save Pakistani Girl Between War 
ग्लोबल

युद्धातही जपली माणुसकी! भारतीय मुलाने पाकिस्तानी मुलीला बॉम्बपासून वाचवले

अंकित कीवच्या पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये युक्रेनियन भाषेचा विद्यार्थी आहे

सकाळ डिजिटल टीम

रशिया युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. खारकीवमध्ये परिस्थिती बिघडली तेव्हा अंकित नावाच्या भारतीय मुलाला एका बंकरचा आसरा घ्यावा लागला. त्या बंकरमध्ये असलेले ८० लोकं पाकिस्तानी होते. फक्त तोच एक भारतीय होता. त्याने भारतात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा या ८० जणांबरोबर राहत असलेल्या एका मुलीनेही सोबत येण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर युद्ध आणि बॉम्बहल्ल्यापासून रक्षण करत दोघे २५ किलोमीटर चालत रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तिथून रोमानिया बॉर्डरला आले.

अशी घडली घटना

अंकित कीवच्या पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये युक्रेनियन भाषेचा विद्यार्थी आहे. 25 फेब्रुवारीला रात्री कीवमधील परिस्थिती बिघडली. त्यानंतर संस्थेपासून तीन किमी अंतरावर स्फोट झाला. त्यामुळे जवळपास 80 विद्यार्थ्यांना बंकरमध्ये पाठवण्यात आले ज्यामध्ये अंकित हा एकमेव भारतीय होता. तिथे असलेली पाकिस्तानी मुलगी मारिया खूप घाबरलेली होती. तिथे सतत बॉम्ब कोसळत होते. यामुळे अंकितने तिथून निघण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मारियाही त्याच्यासोबत यायला तयार झाली. अंकितने तिच्या घरच्यांशी बोलून तिला सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले. २८ फेब्रुवारीला दोघेही कीवच्या बुगजाला रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी चालत निघाले. दोघांनी २ दिवस काही खाल्ले नव्हते. (Indian Student Save Pakistani Girl Between War)

Ukraine Russia War

डोक्यावरून गेली गोळी

मारिया चालून चालून दमली होती. म्हणून अंकितने तिचे सामान स्वत: उचलले आणि फायरिंगपासून वाचत दोघे ५ किलोमीटर चालत स्टेशनवर पोहोचले. तिथे खूपच गर्दी होती. तरीही त्यांना जागा मिळाली. एक तासाच्या प्रवासानंतर ट्रॅकच्या बाजूला जोरदार ब्लास्ट होऊन फायरिंग सुरू झाले. एक गोळी खिडकीवरून त्यांच्या डोक्याच्या वरून गेली. ट्रेनमधले सर्व लोक खाली लपले. त्यानंतर १ मार्चला टर्नोपिल स्टेशनवर पोहोचले. तिथे मारियाचा संपर्क पाकिस्तानी दूतावासाशी झाला. तिला त्यांनी टर्पोनिल मेडिकल विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये ठेवले. तिथे त्यांना कॉफी, ब्रेड, सूप खायला दिले. त्यांनतर दोघांनाही पाकिस्तान दूतावासाने स्वखर्चाने तेरनोपिल ते रोमानिया सीमेवर बसने पाठवले. बस चालक 15-20 किमी आधी निघून गेला. तिथून पायीच सीमेपर्यंत जायचे होते. ते सीमेवर पोहोचले तेव्हा हजारो लोक होते. तिथले स्थानिक लोक विद्यार्थ्यांना मदत करत आहेत.

पाकिस्तानी दुतावासाने केले कौतुक

मीडिया रिपोर्टनुसार, ज्याप्रकारे एका भारतीयाने पाकिस्तानी मुलीचे प्राण वाचवले ते बघून पाकिस्तानी दुतावासाने अंकितचे कौतुक केले. सध्या दोन्ही देशांनी एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. कारण द्वेषापेक्षा आपली मुलं महत्त्वाची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT