Russia Ukrain War : "युक्रेनमध्ये हवाई हल्ल्यानंतर भयावह स्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या दुकानांमधून लोकांनी डाळ, पीठ सर्वकाही खरेदी केले आहे. आम्ही पोहोचेपर्यंत सर्वकाही संपले होते. अशा स्थितीत आमच्याकडे खाण्यासाठी मॅगी, फळ, ब्रेड किंवा ज्यूस आदी खरेदी करण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही काय करावे, खाण्यासाठी जे काही खरेदी केले, ते अवघे दोन-तीन दिवसच पुरेल", ही व्यथा मांडलीये युक्रेनच्या इवानोमध्ये अडकलेल्या भारतातील (India) बिजनौर (उत्तर प्रदेश) येथील विद्यार्थी सना उर्र रहमानने.
सना हा इवानो फ्रेन्कविस्क इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तो म्हणतो, भारतीय दुतावासाच्या वतीने युक्रेन (Ukraine) सोडण्याची वारंवार सल्ला दिला जात होता. मात्र विद्यापीठाच्या वतीने सुरु ऑनलाईन वर्गाची परवानगी मिळत नव्हती. त्यानंतर जेव्हा ऑनलाईन वर्गाची परवानगी मिळाली, तोपर्यंत स्थिती फार बिघडली होती. (Ukraine Russia War Indian Student Stranded In Ukraine)
भारतीय विद्यार्थ्यांची स्थिती चिंताजनक
सना उर्र रहमान म्हणतो, बुधवारी रात्री काही ठिकाणी हवाई हल्ले केले गेले आहे. त्यानंतर अतब सुपरमार्केटमध्ये खाद्यसामग्री खरेदी करणाऱ्या लोकांची गर्दी सुरु झाली. आम्हाला माहित नव्हते, की इतके लवकर सर्व काही संपवून जाईल. सनाबरोबर राहणारा मेरठचा मित्र जासिम नदीम याने सांगितले, की सुपरमार्केटमधून सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी खाण्याच्या वस्तू विकत आणले आहे. मात्र कोणालाही पीठ किंवा तांदूळ मिळू शकले नाही. पहिल्यांदा असे होते की आम्ही रोटी आणि भात न खाता झोपत आहोत. (Indian Students Strands In Ukraine)
बिजनौर येथील जुबेर सिद्दीकी (एमबीबीएस) म्हणतो, आम्ही सहा जण रुममध्ये आहोत. राशनची टंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. आमच्या जवळ केवळ सहा लीटर पाणी आहे. टाकीतील पाणी खारे असल्याने ते पिणे शक्य होत नाही. या व्यतिरिक्त एटीएममध्ये पैसे नाहीत. आम्हाला माहीत नाही की पुढे काय होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.