Ukraine Russia War Updates e sakal
ग्लोबल

Ukraine : आईसाठी औषधं आणायला गेली, गोळीबारात तरुणीसह तिघे ठार

सकाळ डिजिटल टीम

रशिया युक्रेनमध्ये आज १८ व्या दिवशी देखील युद्ध (Ukraine Russia War) सुरूच आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, तर शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. आपल्या आईसाठी औषध आणायला गेलेल्या एका तरुणीवर रशियन सैनिकांनी गोळीबार (Russian Shelling) केला. यामध्ये या तरुणीसह तिची आई आणि कार चालकाचा देखील मृत्यू झाला.

व्हेलेरिया मॅकसेस्का (३१), असे या मृत तरुणीचे नाव आहे. ती प्रशिक्षित डॉक्टर होती. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तिने नागरिकांच्या मदतीसाठी युक्रेन न सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजारी आईचं औषध संपल्यामुळे त्यांनी देश सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या देशात तिचा औषधोपचार होईल या विचाराने ती, तिची आई इरिना आणि चालक कारने निघाले. किव्हच्या शहराजवळील एका गावातून रशियन सैनिकांचा ताफा जाण्याची वाट पाहत होते. इतक्यात रशियन सैनिकांनी तिच्या कारवर गोळीबार केला. यामध्ये तिच्यासह आजारी आई आणि कार चालकाचा मृत्यू झाला. याबाबत 'डेली मेल'ने वृत्त दिले आहे.

व्हेलेरिया यांचा जन्म डोनेत्सक येथे झाला. २०१४ मध्ये झालेल्या रशियाच्या आक्रमणाला तिने उत्तर देखील दिले होते. रशियाच्या गोळीबारातून वाचल्यानंतर तिने किव्ह गाठले. त्यानंतर ती युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID)मध्ये काम करत होती. ती अत्यंत दयाळू, शूर आणि हुशार तरुणी होती, असं USAID च्या अधिकारी समंथ पॉवर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी व्हेलेरिया यांच्या मृत्यूबाबत दुःख देखील व्यक्त केलं आहे.

रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीला आक्रमण केलं. त्यानंतर हळूहळू देशातील एक एक भागांवर हल्ले सुरू केले. युद्धामुळे युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच जीवाच्या भीतीनं अनेकांनी देश सोडला आहे. रशियाच्या बॉम्बहल्ल्यात आणि गोळीबारात युक्रेनचे सैनिक आणि नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान, या युद्धात आतापर्यंत 12 हजारांहून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Terminus चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! Platform Ticket ची विक्री बंद, पण किती दिवसांसाठी? जाणून घ्या

Pakistan Economical Crisis : IMF च्या कर्जानंतरही पाकिस्तानचे हाल सुरूच... आता चीनकडून मागितलं अब्जावधींचं कर्ज

Mohol Assembly Election 2024 : अखेर मोहोळ विधानसभेचा सस्पेन्स संपला, सिद्धी कदम महाविकास आघाडीच्या उमेदवार

Soneri Bhog Sweet: 24 कॅरेट सोन्याचा वापर; महाराष्ट्रात 'सोनेरी भोग' मिठाई आकर्षणाचे केंद्र, किंमत ऐकून व्हाल थक्क

Pakistan Cricket: पाकिस्तानने नवा ODI-T20I कॅप्टन केला जाहीर; 'हा' खेळाडू घेणार बाबर आझमची जागा

SCROLL FOR NEXT