न्यूयॉर्क : जगावर ऊर्जा संकट आले असतानाही जगातील गरीब देशांना अडचणीत आणून विक्रमी नफा कमाविणाऱ्या तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांच्या हावरटपणावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी तीव्र टीका केली आहे. सर्व जग अडचणीत असताना त्याचा फायदा उठवून तेल कंपन्यांनी पहिल्या तिमाहीतच एकत्रितपणे शंभर अब्ज डॉलर नफा उकळला असून हे अनैतिक आहे, असे गुटेरेस यांनी म्हटले आहे.
जागतिक संकटाबाबतच्या प्रतिसाद गटाने तयार केलेला अहवाल गुटेरेस यांनी आज प्रसिद्ध केला. यावेळी गुटेरेस म्हणाले की,‘कोरोना संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असलेल्या आणि युक्रेन युद्धाचाही फटका बसलेले देश सावरण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अन्न, ऊर्जा आणि पैसा या एकमेकांशी संबंध असलेल्या तीन संकटांचा सामना करावा लागत आहे. या स्थितीत तेल कंपन्यांनी अडचणीचा फायदा उठवून प्रचंड नफा कमाविला.’
संयुक्त राष्ट्रांकडून आवाहन
श्रीमंत देशांनी सार्वजनिक वाहतूकीला प्रोत्साहन द्यावे
वाहतूकीचे पर्यावरणपूरक पर्याय शोधावेत
नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाहतुकीच्या साधनांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्हावा
ऊर्जा तंत्रज्ञानासाठीच्या कच्च्या मालाची पुरवठा साखळी सक्षम करावी
प्रत्येक देशाला ऊर्जा संकटाची झळ बसत आहे. तरीही, प्रत्येकाचे लक्ष दुसरा काय करतो, याकडेच आहे. अनेक विकसनशील देशांना वादळे, वणवे, पूर आणि दुष्काळांचा फटका बसत आहे. ते शाश्वत ऊर्जेसाठी गुंतवणूक करू शकतात.
- अँटोनिओ गुटेरेस, सरचिटणीस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.