Putin And Biden Sakal
ग्लोबल

Ukraine Crisis LIVE : रशियात घुसल्यास कत्तल.. अमेरिकेकडून मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine Conflict Live Updates

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील पूर्व भागाचे दोन तुकडे केले आहेत. डोनेत्स्क आणि लुहान्स्क (Donetsk And Luhansk) या दोन भागांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देत असल्याची घोषणा पुतीन यांनी केली. रशियाने उचलेले हे पाऊल युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव आणखी वाढवणारं ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. या निर्णयावर अमेरिकेने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. (Vladimir Putin Declared Donetsk and Luhansk as a new Nations)

रशियात घुसल्यास कत्तल..अमेरिकेकडून मोठा खुलासा

रशियाने दोन राष्ट्रांची घोषणा करून राजकीय संघर्ष ओढावून घेतला आहे. यावर जगभरातून नाराजी व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतही यासंदर्भात माहिती देण्यात आली. संयुक्त राष्ट्रांनी शांतता फौज किंवा आमेरिकेने संबंधित राष्ट्रात सैन्य पाठवल्यास रशिया स्थानिक पातळीवर कत्तली करेल, असा दावा अमेरिकेने केला आहे. यासंदर्भात रशियाने हिटलिस्टदेखील तयार केली आहे, असं अमेरिकेने म्हटलंय.

सध्या रशियाच्या निर्णयाला विरोध करणारे आणि युक्रेनमधील कमकुवत वर्ग पुतीन यांच्या निशाण्यावर आहे. रशियन सैन्य या लोकांना ठार मारू शकतं, असं अमेरिकेने म्हटलंय. यानंतर रशियाने मात्र अमेरिकेचा दावा फेटाळला आहे.

एअर इंडियाची तीन विमानं उड्डाणं करणार

आता एअर इंडियाने उक्रेनस्थित भारतीय नागरिकांना माघारी आणण्यासाठी विमानं पाठवली आहेत. युक्रेनमध्ये २० हजार भारतीय वास्तव्यास आहेत. त्यांना तत्काळ भारतात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रात यासंदर्भात माहिती देखील देण्यात आली आहे.

एअर इंडियाचं पहिलं विशेष विमान (AI-1946) युक्रेनहून आज रात्री भारतीय नागरिकांसह युक्रेनमधून उड्डाण करणार असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. या मोहिमेत तीन विशेष विमानांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या उड्डाणांसाठी आवश्यक हवाई परवाने देखील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमेरिकेने युक्रेनच्या विभक्त प्रदेशांमध्ये नव्याने गुंतवणूक, व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधी कार्यकारी आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर तत्काळ संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक बोलवली आहे.

यामध्ये रशियाच्या विस्तारवादी धोरणांवर प्रकाश टाकण्यात येत असून अनेक राष्ट्रांनी पुतीन यांच्या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिघळल्याचं स्पष्ट झालं आहे. (United Nations Holds Emergency Meet on Russia Ukraine Conflict)

युद्धाला आमंत्रण?

युक्रेनने शत्रुत्वाचा विचार बाजूला ठेवावा अन्यथा जे काही होईल त्याला ते स्वत: जबाबदार , अशा भाषेत पुतिन यांनी युक्रेनला तंबी वजा इशाराही दिला आहे. युक्रेनमधील पश्चिमी क्षेत्रातून विरोध होत असताना रशियाने युक्रेनमधील पूर्वेकडील भागाला स्वतंत्र बहाल करुन दोन तुकडे केल्यामुळे दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे संकेत आणखी गडद झाले आहेत.

यापूर्वी युक्रेनमधील फुटीरतावादी नेत्यांनी टेलिव्हिजनवरील प्रसारित एका निवेदनाच्या माध्यमातून रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विनंती केली होती. पूर्वेकडील भागाला स्वतंत्र बहाल करा आणि मित्रत्वाच्या करारावर स्वाक्षरी करायला पुढे या. युक्रेनच्या सैन्याकडून होणाऱ्या आक्रमणापासून वाचण्यासाठी मदत पुरवण्याचे आवाहनही फुटीरतावादी नेत्यांनी केले होते. या नेत्यांसोबत कोणतीही चर्चा करण्यापूर्वीत पुतिन यांनी पूर्वेकडील दोन भाग स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील तापलेल्या वातावरणात या निर्णयामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT