unseasonal rain update dubai uae rain airport closed due to heavy rain and storm Sakal
ग्लोबल

वाळवंटाचे शहर पावसाच्या पाण्याखाली; दुबईसह ‘यूएई’मध्ये मुसळधार; अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

लांबवर पसरलेले वाळवंट आणि उष्ण हवामान अशी ओळख असलेल्या संयुक्त अरब अमिरातीला मंगळवारी (ता.१६) अतिवृष्टीने झोडपून काढले.

सकाळ वृत्तसेवा

दुबई : लांबवर पसरलेले वाळवंट आणि उष्ण हवामान अशी ओळख असलेल्या संयुक्त अरब अमिरातीला मंगळवारी (ता.१६) अतिवृष्टीने झोडपून काढले. जागतिक व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या दुबईमध्ये दीड-दोन वर्षांत जितका पाऊस पडतो तितका पाऊस एकाच दिवसात पडल्यामुळे रस्ते आणि शहराचा बराचसा भाग पाण्याखाली गेला.

या प्रचंड पावसामुळे आज दुसऱ्या दिवशीही जनजीवन ठप्प झाले होते. विमानतळांवरही पाणी साचल्याने अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली.

दुबईत मंगळवारी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. येथील मागील ७५ वर्षांच्या नोंद झालेल्या इतिहासात एवढा पाऊस झालेला नाही. बाहरीन, ओमान, कतार आणि सौदी अरेबियातही पाऊस कोसळला. ‘यूएई’त २४ तासांमध्ये १० इंच पाऊस झाला. जगातील अत्यंत व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई विमानतळावर ३.७३ इंच पाऊस कोसळला. त्यामुळे हवाई वाहतूक ठप्प होऊन हजारो प्रवासी विमानतळावरच खोळंबले. अनेक मेट्रो स्थानके, मॉल, रस्ते, व्यावसायिक इमारतींमध्ये पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. पावासामुळे ‘युएई’मध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. घरे आणि आस्थापनांचेही मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांवर प्रचंड कचरा आला असून तो साफ केला जात आहे.

ओमानमध्ये मुसळधार पावसामुळे मागील काही दिवसांत १९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्या देशाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रवाशांचे हाल

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विमानतळाची सेवा मंगळवारी आणि आजही बंद ठेवण्यात आली होती. अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली. प्रवासाचे नियोजन असणाऱ्या प्रवाशांना ‘विमानतळावरच येऊ नका’ अशा सूचना देण्यात आल्या.

‘क्लाउड सीडिंग’चा परिणाम?

आखाती देशांमध्ये झालेला पाऊस हा ‘क्लाउड सीडिंग’चा परिणाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याच्या या पद्धतीत छोटी विमाने ढगांमध्ये जाऊन विशिष्ट प्रकारचे मीठ फवारतात. या मिठामुळे ढगांमध्ये पाणी निर्माण होऊन पाऊस कोसळतो. हा पाऊस कोसळण्यापूर्वी सहा ते सात विमानांद्वारे मीठ फवारणी झाली होती, असा दावा केला जात आहे. सरकारने मात्र या दाव्याचा इन्कार केला आहे. ओमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळेच पाऊस कोसळल्याचे ‘यूएई’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईहून दुबईला जाणारे आमचे विमान पावसामुळे रद्द झाले. आमच्या सारख्या अनेकांनी प्रवासाचे फेरनियोजन केले आहे. दुबईत विमानतळांवर हजारो जण अडकून पडले असल्याने तेथून बाहेर पडून मोटारीने दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीही काही तास लागत आहेत.

- बादल दीक्षित, सीईओ, ‘पर्ल क्वेस्ट’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT