Urmila Arjunwadkar  sakal
ग्लोबल

कोल्हापूर : जयसिंगपूरची कन्या झाली अमेरिकेत नगरसेविका

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर) : अमेरिकेतील (America) न्यूजर्सी (New Jersey) भागात पार पडलेल्या नगरपरिषदीय निवडणूकीत होपवेल टाउनशिपमध्ये नगरसेविका (कॉउंसिलर) म्हणून जयसिंगपूरची कन्या उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर (Urmila Arjunwadkar) (सौ. उर्मिला अशोक पुरंदरे) निवडून आल्या आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार एडवर्ड एम. जॅकोवस्की (Edward M. Jakowski) यांचा एक हजाराच्या मताधिक्यानी पराभव केला आहे.

होपवेल टाऊनशिपच्या तीनशे वर्षाच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मानही उर्मिला यांनी पटकावला आहे. उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर ह्या येथील चौथ्या गल्लीतील विजया व जनार्दन दामोदर अर्जुनवाडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण जयसिंगपूरमध्ये 'बी' वॉर्ड शाळा, जयसिंगपूर हायस्कूल व जयसिंगपूर कॉलेज येथे झाले. त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून पदवीउत्तर शिक्षण पूर्ण केले. सध्या त्यांचे वास्तव्य अमेरिकेतील न्युजर्सी राज्यांतील होपवेल येथे असून त्या सुप्रसिद्ध औषध निर्मिती कंपनीत गेली २५ वर्षं शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन कार्य प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिके आणि परिषदांमध्ये प्रसिध्द झाले आहे. त्याला आंतरराष्टीय विज्ञान जगतात मान्यता मिळाली आहे.

होपवेल टाऊनशिपच्या तीनशे वर्षाच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मानही उर्मिला यांनी पटकावला आहे.

न्यूजर्सी येथे त्यांनी महाराष्ट्रीयन व भारतीय संस्कृती, परंपरा व मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी मराठी शाळा व संस्कार वर्गांची सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडे गणपती उत्सव ही गेली २५ वर्षं मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गर्ल स्काउट्स-लीडर, पालक शिक्षक संघटना पदाधिकारी, होपवेल व्हॅली फूड पॅंट्री आणि ए टू झेड मार्गदर्शन उपक्रम या स्थानिक संस्थानच्या कार्यांत त्यांचा सहभाग असतो. या व अश्या बऱ्याच सामाजिक कार्यांत त्यांचा पुढाकार व सक्रीय सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांची झोनिंग व ऍडजस्टमेंट बोर्डवर सहकारी, सहायक सदस्य म्हणून नेमणूक केली गेली.

सहा वर्षांपासून टाउनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे काम त्या पाहत आहेत. त्यामुळे त्यांना टाउनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे विस्तृत ज्ञान व सखोल जाण निर्माण झाली आहे. त्यातूनच त्यांना या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या निवडणूकीत दैदिप्यमान यश मिळवून जयसिंगपुरचा आणि भारताचा झेंडा फडकवला. त्यांना या निवडणूकीत ३७०१ मते मिळाली. त्यांच्या कामगिरीचे अमेरिकेत विविध स्तरावर कौतुक होत आहे. त्यांचा शपथ विधी कार्यक्रम जानेवारीमध्ये होणार आहे. जयसिंपूरमध्ये असताना देखील विविध क्रीडा व सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असे. त्यांनी जयसिंगपूर कॉलेजमध्ये जयसिंगपूरचे विद्यार्थिनी प्रमुखपदही भूषविले आहे.

विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघात निवड झाली होती व सांघिक सुवर्ण पदकही जिंकले होते. या त्यांच्या यशामध्ये त्यांचे पती अशोक पुरंदरे, मुलगा रोहित व मुलगी राधिका यांचा मोठा वाटा आहे. या विजयाचे श्रेय जयसिंगपूर नगरीत झालेल्या जडणघडणीस आणि कुटूंबियांच्या, स्थानिक सहकाऱ्यांच्या व मतदारांच्या भक्कम पाठींब्याला आहे असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT