US and British intelligence agencies warned be aware China Washington canva sakal
ग्लोबल

चिनी धोक्यापासून सावध राहा!

अमेरिका व ब्रिटनच्या गुप्तचर संघटनांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : पाश्‍चिमात्य देशांनी चीनकडून धोका असल्याचा इशारा अमेरिकेची ‘एफबीआय’ आणि ब्रिटनची ‘एम१५’ या गुप्तचर संघटनांनी संयुक्तपणे दिला आह. चीनबाबत भारतानेही सावध होणे आवश्‍यक आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. ‘एफबीआय’ आणि ‘एम१५’ या गुप्तचर संघटनांनी इतिहासात प्रथमच एका व्यासपीठावर येत चीनबाबत जगाला सावध केले. ‘एम१५’चे प्रमुख केन मॅककॅलम व ‘एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर व्रे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पाश्‍चिमात्यांचे तंत्रज्ञान चोरण्याचा आणि दमनशाही व पैशांच्या जोरावर सरकारी धोरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. चीनबाबत भारतानेही सावध होणे आवश्‍यक आहे, असा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताला जागे होण्याची वेळ आली आहे, असे गुप्तचर संघटनांनी म्हटले आहे.

चीनी मुत्सद्दी आणि नोकरशहा राष्ट्रीय विकासाच्या गरजा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताकदीचा समन्वय साधत असताना भारतीय नोकरशहा त्यांचा वारसा सांभाळण्याच्या प्रयत्नात प्रत्येक फाईलवर कनिष्ठांसाठी ‘कृपया बोलावे,’ असा शेरा लिहिण्यातच धन्यता मानतात, याकडे या गटाने लक्ष वेधले आहे. ताबा रेषेवर चीन वेगाने मोठ्या प्रमाणावर लष्करी पायाभूत सुविधा उभारत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली.

मॅककॅलम व व्रे प्रमुख म्हणाले...

  • चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी जवळचे संबंध आहेत म्हणून परिस्थिती बदलेल, हा समज चुकीचा.

  • चीनच्या दबावाविरोधात पावले उचलणे आवश्‍यक आहे.

  • रशियाने ज्याप्रमाणे युक्रेनवर हल्ला केला, त्याप्रमाणे तैवानचा ताबा जबरदस्तीने घेण्याचा चीनचा प्रयत्न.

  • चीनकडे गुप्तचरांचे विशाल जाळे आहे आणि त्यांचा हॅकिंगचा कार्यक्रम जगातील सर्व देशांमधील मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT