अमेरिका : युनायटेड स्टेट्सचे नौदल (US Navy) त्यांच्या सर्वात प्रगत लढाऊ विमान F-35 चे अवशेष लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. हे जेट दक्षिण चीन समुद्रात खोलवर कोसळले होते. दरम्यान चीनला (china) कोणत्याही परिस्थितीत या विमानाचे अवशेष सापडू नये, असे अमेरिकेला वाटत आहे.
चिनी मीडियाने उडवली खिल्ली
चीनी मीडियाने यावर खिल्ली उडवली आहे की, F-35C क्रॅशने अमेरिकन सैन्याचा कमकुवतपणा उघड केला, जे आपल्या सैनिकांच्या जोरावर चीनविरूद्ध आपले पराक्रम दाखवत करत आहे. अमेरिकेला भीती आहे की, चीन आपले तंत्रज्ञान चोरी करेल. स्टिल्थ फायटर जेटचे अवशेष परत मिळवण्यासाठी अमेरिकन नौदल सतत झटत आहे. कारण चिनी नौदल तेथे आधी पोहोचू नये आणि युद्ध लढण्याचे नवीनतम तंत्रज्ञान कॉपी करू नये. यूएस न्यूज एजन्सी सीएनएनने वृत्त दिले आहे की, या ऑपरेशनवर चीनकडूनही बारीक लक्ष ठेवले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जाणून घ्या चीन का करतोय घाई?
चीनला कोणत्याही किंमतीत अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमान F-35 चे अवशेष शोधायचे आहेत. यासोबतच समुद्राच्या खोल पाण्यात बुडालेला ब्लॅक बॉक्सही मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. या फायटर जेटच्या अवशेषातून चीनला अमेरिकेच्या इथल्या उपस्थितीबद्दल जाणून घ्यायचे आहेच, शिवाय आणखी अनेक माहिती मिळवण्याचाही तो प्रयत्न करत आहे. या अत्याधुनिक जेटचे तंत्रज्ञान चोरून अमेरिकेवर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.