वॉशिंग्टन: कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटमुळे ओमिक्रॉनचा धोका वाढतच चालला आहे. तब्बल 24 देशांमध्ये ओमिक्रॉनने आता हातपाय पसरले आहेत. आता ओमिक्रॉनने अमेरिकेत देखील शिरकाव केला आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या एका व्यक्तीमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं दिसून आली आहेत. अमेरिकेत आढळलेला ओमिक्रॉन व्हेरियंटचा हा पहिलाच रुग्ण आहे. तर अमेरिकेमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर व्हाईट हाऊसने अमेरिकन नागरिकांना कोरोना लस आणि बूस्टर डोस घेण्याची विनंती केली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून कॅलिफॉर्नियात आला होता व्यक्ती
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. एंथनी फौची यांनी सांगितलंय की, दक्षिण आफ्रिकेतून कॅलिफोर्नियामध्ये परतलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संक्रमण आढळून आलं आहे. या व्यक्तींचं संपूर्ण लसीकरण झालेलं होतं. मात्र, तरीही त्याला सौम्य स्वरुपाची लक्षण दिसून येत होती. मात्र, आता त्यात हळूहळू सुधारणा होत आहे.
या देशात आढळले रुग्ण
कॅनडा, बेल्जियम, ब्राझील, फ्रान्स, झेक रिपब्लिकन, स्पेन, इटली, नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, इस्त्राईल, सौदी अरेबिया, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, डेन्मार्क या देशांमध्ये ओमिक्रॉनने संक्रमित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देशांनी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. जपानने आता लोकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.