United States President sakal
ग्लोबल

United States President : अध्यक्षांवर हल्ल्याचा अमेरिकेचा इतिहास

अमेरिकेच्या अध्यक्षांवर किंवा माजी अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला होणे, ही नवी बाब नाही. याआधीही अशा प्रकारचे हल्ले झाले असून काही अध्यक्षांचा त्यात जीवही गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षांवर किंवा माजी अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला होणे, ही नवी बाब नाही. याआधीही अशा प्रकारचे हल्ले झाले असून काही अध्यक्षांचा त्यात जीवही गेला आहे.

अब्राहम लिंकन (१६ वे अध्यक्ष) :

१४ एप्रिल, १८६५

लिंकन हे आपल्या कुटुंबीयांसह एका कार्यक्रमाला गेले असताना त्यांना गोळी मारण्यात आली. उपचारांदरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. कृष्णवर्णीयांच्या हक्कांना लिंकन यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचे मानले जाते.

अॅम्स गारफिल्ड (२० वे अध्यक्ष) :

दोन जुलै, १८८१

वॉशिंग्टन येथील रेल्वे स्थानकावर गारफिल्ड आले असताना एका व्यक्तीने त्यांना गोळी मारली. टेलिफोनचा शोध लावणारे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी विशिष्ट उपकरणाद्वारे गारफिल्ड यांच्या छातीत घुसलेली गोळी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सप्टेंबरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. पद स्वीकारल्यानंतर सहाच महिन्यात हा प्रकार घडला.

विल्यम मॅक्‌किनली (२५ वे अध्यक्ष) :

सहा सप्टेंबर, १९०१

न्यूयॉर्क येथे भाषण दिल्यानंतर समर्थकांबरोबर हस्तांदोलन करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या छातीत दोन गोळ्या मारल्या. हल्ल्यानंतर सहा दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला.

फ्रँकलिन डी. रूझवेल्ट (३२ वे अध्यक्ष) :

फेब्रुवारी १९३३

अध्यक्षपदी निवड झालेले रुझवेल्ट मियामी येथे खुल्या मोटारीतून जाताना गोळीबार. रुझवेल्ट यांना काही झाले नाही, मात्र त्यांच्याबरोबर असलेल्या शिकागोच्या महापौरांचा मृत्यू.

हॅरी ट्रुमन (३३ वे अध्यक्ष) :

नोव्हेंबर, १९५०

ट्रुमन हे व्हाइट हाऊसच्या समोरील ब्लेअर हाऊसमध्ये राहत असताना दोन जणांनी घुसखोरी करत गोळीबार केला. ट्रुमन यांना काहीही झाले नाही. हल्लेखोर पोलिसांच्या गोळीबारात ठार.

जॉन एफ. केनेडी (३५ वे अध्यक्ष) :

नोव्हेंबर, १९६३

डल्लास दौऱ्यावर असताना केनेडी यांच्यावर गोळीबार. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारांदरम्यान मृत्यू.

गेराल्ड फोर्ड (३८ वे अध्यक्ष) : १९७५

एकाच आठवड्यात दोन वेळा हल्ला. दोन्ही वेळा बचावले.

रोनाल्ड रेगन (४० वे अध्यक्ष) :

मार्च १९८१

वॉशिंग्टनमध्ये भाषण झाल्यावर मोटारीच्या दिशेने जात असताना गोळीबार. रेगन जखमी झाले.

जॉर्ज डब्लू. बुश (४३ वे अध्यक्ष) :

२००५ मध्ये एका सभेमध्ये बाँब फेकला. मात्र, बाँब न फुटल्याने बुश आणि इतर जण बचावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

Latest Maharashtra News Updates : राजकीय पुढारी, उमेदवारांचे शहर महामार्गांवर मोठाले बॅनर

SCROLL FOR NEXT