Same Sex Marriage  Sakal
ग्लोबल

अमेरिकेत समलैंगिक विवाहाला फेडरल संरक्षण देणारे विधेयक मंजूर

हे विधेयक कनिष्ठ सभागृहात मंजूर होऊनही सिनेटमध्ये मंजूर होईल की नाही याबद्दल अनिश्चितता कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

Same-Sex Marriage : अमेरिकेत समलिंगी विवाहाची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. कारण यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने समलिंगी विवाहाला फेडरल संरक्षण देणारे विधेयक मंजूर केले आहे. मंगळवारी हे विधेयक 267 पैकी 157 मतांनी मंजूर झाले. मंगळवारी, 47 रिपब्लिकन खासदारांनीही यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये या विधेयकाचे समर्थन केले.

तथापि, हे विधेयक कनिष्ठ सभागृहात मंजूर होऊनही सिनेटमध्ये मंजूर होईल की नाही याबद्दल अनिश्चितता कायम आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोन्ही पक्षांचे 50 संसद सदस्य आहेत. अशा परिस्थितीत हे विधेयक मंजूर होण्यासाठी डेमोक्रॅट पक्षाला किमान 10 रिपब्लिकन खासदारांना आपल्या बाजूने आणावे लागेल.

न्यायालयाने यापूर्वी सुनावलेला गर्भपाताचा जुना निर्णय रद्द केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय समलिंगी विवाहाबाबतच्या आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची शक्यता आहे. कारण, सध्या यूएस सुप्रीम कोर्टात कंझर्व्हेटिव्ह न्यायमूर्तींची संख्या जास्त आहे, जे समलिंगी विवाह आणि गर्भपाताबद्दल त्यांच्या पुराणमतवादी विचारांसाठी ओळखले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy 2024-25: शम्स मुलानीच्या ६ विकेट्स! मुंबईकडे ३१७ धावांची आघाडी, ओडिसाला दिला फॉलो ऑन

Narendra Modi: लोकसभेचा धसका? तब्बल 49 मिनिटे भाषण, फक्त काँग्रेस, काँग्रेस अन् काँग्रेस! महायुतीसाठी पंतप्रधान अॅक्शन मोडमध्ये

Narendra Modi in Dhule: ''त्या दिवशी मी गप्प बसलो पण...'' मोदी लवकरच पूर्ण करणार फडणवीसांची 'ती' इच्छा, पंतप्रधानांचा धुळ्यात शब्द

Latest Maharashtra News Updates : जुन्नर पोलिसांनी साडेतीन लाखाच्या ३५ मोबाईलचा घेतला शोध

Solapur Assembly Election : तुतारी ते ट्रम्पेट : बार्शी वगळता 'या' 10 मतदारसंघात 'ट्रम्पेट'; कोणाची चालणार जादू?

SCROLL FOR NEXT