Diwali 
ग्लोबल

Diwali Festival : अमेरिकेतही आता दिवाळीची सार्वजनिक सुट्टी?

बायडन सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय

Amit Ujagare (अमित उजागरे)

Diwali Festival 2021 : दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. पाच दिवस चालणारा हा सण म्हणजे भारतीयांसाठी पर्वणीच! मिठाई, कपडे, वस्तूंच्या खरेदींसह मोठ्या उत्साहात हा दिव्यांचा सण भारतात दरवर्षी पारंपारिक पद्धतीनं साजरा होतो. आता अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनाही अशाच प्रकारे एकत्र येऊन दिवाळी साजरी करता येणं शक्य होणार आहे, याचं कारण म्हणजे अमेरिकेतही दिवाळीची सार्वजनिक सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी तिथल्या बायडन सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Diwali Holiday in USA)

बुधवारी अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये (संसद) एक विशेष विधेयक मांडण्यात येणार आहे. यामध्ये दिवाळीला फेडरल सुट्टी (सार्वजनिक सुट्टी) घोषित करण्याच्या विषयाचा समावेश असेल. अमेरिकेच्या खासदार कॅरोलिना मॅलोनी हे विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकाला डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदारांसह इंडिया कॉकस, खासदार रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती आणि इतर अधिवक्त्यांचा पाठिंबा असणार आहे.

दरम्यान, जर या विधेयकाला मंजुरी मिळाली तर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना दिवाळीत सुट्टी सेलिब्रेट करण्याची संधी मिळेल तसेच अमेरिकन भारतीयांच्या सांस्कृतीक परंपरेचाही सन्मान केला जाईल. या विधेयकाला मंजुरी मिळताच अमेरिकेतील अनेक सार्वजनिक कार्यालयांमध्ये सुट्टी जाहीर केली जाऊ शकते.

अमेरिकेच्या खासदार कॅरोलिन मॅलोनी या भारतीय अधिवक्त्यांसोबत मोठ्या काळापासून काम करत आहेत. त्यांनीच यापूर्वी भारतीय दिवाळीच्या पर्वाला सन्मानित करण्यासाठी एका टपाल तिकीटाचं प्रकाश केलं होतं. हे टपाल तिकीट सन २०१६ पासून अमिरेकेत अद्यापही वापरलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT