US military to stand with India in conflict with China indicates White House official 
ग्लोबल

भारत-चीन युद्ध झाल्यास अमेरिका मैदाना उतरणार; व्हाईट हाऊसची घोषणा

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवासांपासून भारत-चीन संघर्ष हा शिगेला पोहोचला असून दोन्ही देश एकमेकांना सडेतोड उत्तर देत आहेत. अशात भारतही रणनिती आखत असून चीनविरोधातील या संघर्षांत अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे आलेले आहेत. विशेष म्हणजे रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांनीही भारत-चीन वादात सावध पवित्रा घेतला होता. पण, आता अमेरिकेनं उघड उघड भारताला समर्थन दिलं आहे. जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा व्हाइट हाऊसने केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चीनच्या विस्तारवादी धोरणाला जपान, व्हिएतनाम, तैवानसारखे देश वैतागलेले आहेत. त्यांच्या भूमीत चीन सातत्यानं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा देशांनी आघाडी उघडली असून, भारताला समर्थन दिलं आहे, आता भारताला अमेरिकेचे थेट समर्थन मिळणे ही मोठी बाब मानली जात आहे. चीनला आशियात दादागिरी करू देणार नसल्याचंही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------
चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू
-------------
व्हाइट हाऊसच्या या घोषणेच्या थोड्या वेळानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत चीनवर निशाणा साधला आहे. चीनमुळे अमेरिका आणि उर्वरित जगाला खूप नुकसान सोसावं लागलं, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोज यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात फॉक्स न्यूजला सांगितले की, आम्ही चीन किंवा इतर कोणत्याही देशाला सर्वात शक्तिशाली किंवा प्रभावी शक्ती म्हणून स्वीकारणार नाही, हा संदेश स्पष्ट आहे. 

मिडोज यांनी सांगितले की, अमेरिकेने दोन विमानवाहू युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात पाठवल्या आहेत. अमेरिका ही जगातील सर्वोत्तम शक्ती आहे हे जगाला ठाऊक असेल हे सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. दक्षिण चीन सागर आणि पूर्व चीन समुद्रात प्रादेशिक वाद उकरून काढत असतो. चीन जवळजवळ संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर दावा करतो. व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांच्या भागावर हक्क सांगतो, असंही मिडोज म्हणाले आहेत.

अमेरिकेच्या नौदलाने या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात दोन विमानवाहू जहाज तैनात केल्यानंतर अधिकाऱ्यांनी हे विधान केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी पुन्हा ट्विट केले की, चीनमुळे अमेरिका आणि उर्वरित जगाचे प्रचंड नुकसान झाले. कोरोना विषाणूच्या साथीमुळे अमेरिका, संपूर्ण युरोप आणि भारतासह जगातील इतर देशांची अर्थव्यवस्था जवळजवळ ठप्प झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात चीनने कोरोनाविषयी माहिती का दिली नाही आणि विषाणू जगभर का पसरवू दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT