पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पीएम मोदी क्वाड समिटमध्ये सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींच्या या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 297 प्राचीन मौल्यवान कलाकृती भारताला सुपूर्द केल्या आहेत.
या कलाकृतींची भारतातून परदेशात तस्करी करण्यात आली होती. अमेरिकेने गेल्या 10 वर्षात भारताला अशा 578 ऐतिहासिक वस्तू दिल्या आहेत.
भारताला पुरातन वास्तू परत करण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यापूर्वीचे अमेरिका दौरेही खूप यशस्वी ठरले आहेत. 2021 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा अमेरिकन सरकारने 157 प्राचीन वस्तू भारताला परत केला होता.
2021 मध्ये परत मिळालेल्या प्राचीन वस्तूंमध्ये १२व्या शतकातील कांस्य नटराज पुतळा देखील होता.
प्राचीन मौल्यवान कलाकृती परत मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आपल्याला सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करावे लागतील आणि सांस्कृतिक संपत्तीच्या अवैध तस्करीविरुद्ध मोठा लढा उभारावा लागेल. भारताला 297 मौल्यवान पुरातन वास्तू परत केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बायडन आणि अमेरिकन सरकारचा खूप आभारी आहे."
जुलै 2024 मध्ये दिल्ली येथे 46 व्या जागतिक वारसा समितीच्या निमित्ताने भारत आणि अमेरिकेने पहिल्यांदाच ‘सांस्कृतिक संपदा करार’ वर स्वाक्षरी केली.
भारतातून अमेरिकेत भारतीय पुरातन वास्तूंची अवैध तस्करी थांबवणे हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, गेल्या 10 वर्षांत एकीकडे तस्करी थांबली असताना दुसरीकडे भारताला पूर्वी देशाबाहेर गेलेल्या प्राचीन वस्तू माघारी मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.