friendship between india and america is for the good of the world pm modi replied to Joe Biden's Tweet  sakal
ग्लोबल

Joe Biden India Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन येणार भारतात ; मोदी सोबत करणार चर्चा

सकाळ डिजिटल टीम

Joe Biden India Visit : नवी दिल्ली येथे ९आणि १० सप्टेंबर रोजी G20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतात होणारी हि परिषद जगातील सर्वात मोठी परिषद होईल असे म्हटले जात आहे.भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी इंडोनेशियाकडून G20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे.

यातच जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. व्हाईट हाऊसने हि माहिती समोर आणली आहे. जो बायडन हे ७ सप्टेंबरपासून भारत दौऱ्यावर येणार आहेत. 8 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची बैठक होणार आहे.

याच बरोबर संबंधित जि २० परिषदेच्या अतिथी देशांमध्ये बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. G20 देशांच्या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स अमेरिका आणि युरोपियन युनियनचा यांच समावेश आहे.

या बैठकीमध्ये शांचे नेते स्वच्छ उर्जेचा अवलंब आणि हवामान बदलाशी लढा देण्यासह इतर महत्त्वाच्या जागतिक समस्या सोडवण्यासाठी उचलल्या जाणार्‍या संयुक्त पावलांवर चर्चा करतील असे म्हटले जात असून यावेळी यावेळी रशिया युक्रेन युद्धावरही चर्चा होऊ शकते असे म्हटले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT