Joe Biden 
ग्लोबल

USA Presidential Election: अखेर बायडन घेणार माघार! राष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिसबाबत केलं मोठ विधान

USA Presidential Election: अध्यक्ष जो बिडेन यांनी 2024 च्या शर्यतीतून बाहेर पडण्यास सहमती दर्शवल्याचं कळतं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीतून सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे माघार घेणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. माघार घेतल्याची घोषणा अद्याप अधिकृतरित्या झालेली नाही. पण त्यांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. पत्रकार आणि न्यूजमॅक्स समालोचक मार्क हॅल्पेरिन यांनी गुरुवारी सूत्रांच्या हवाल्यानं याबाबत वृत्त दिलं होतं.

प्रमुख सूत्रांनी एक्सिओसला सांगितलं की, 81 वर्षीय जो बायडन या आठवड्याच्या शेवटी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊ शकतात. पण सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक पावरफुल नेत्या आणि उपाध्यक्ष भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं आपण आपल्याजागी राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून समर्थन करणार नाही, असंही बायडन यांनी म्हटल्याचं न्यूजमॅक्सच्या हॅलपेरिन यांनी आपल्या सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे. पण हॅऱिस यांची इच्छा असल्यास त्यांना पुढील महिन्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत नामांकनासाठी खुल्या अधिवेशनाला सामोरे जावं लागेल.

बायडन किंवा त्यांच्या टीमनं अद्याप या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अनेक माध्यमांनी बायडन शनिवार किंवा रविवार निवडणुकीतून माघार घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

दरम्यान, बायडन यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली असून त्यांना श्वासोच्छवासासंबंधी त्रासाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत, असं राष्ट्राध्यक्षांच्या डॉक्टरांनी गुरुवारी सांगितलं. डॉ. केविन ओ'कॉनर यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, बायडन यांच्या अंगात ताप नाही आणि त्याच्यात कोविडची लक्षण दिसतं असली तरी ती सामान्य आहेत. त्यांच्यावर पॅक्सलोव्हिड या औषधाद्वारे उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT