तेल अवीव- इस्राइल आणि हमासमधील युद्ध सुरु होऊन नऊ दिवस झाले आहेत. हमासने हल्ल्या केल्यापासून युद्धाची तीव्रता वाढली असून इस्राइल अधिक आक्रमक झाला आहे. संघर्षाचे वेगवेगळे व्हिडिओ समोर येऊ लागले आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला असून तो धक्कादायक आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये हमासचा दहशतवादी इस्राइलच्या नागरिकांवर कसा हल्ला करतो आणि शेवटी इस्राइलचे सैनिक त्याला कसं संपवतात याचे चित्रण आहे.
इस्राइल डिफेन्स फोर्सकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात शस्त्रधारी हमासचा अतिरेकी चेक पोस्टवर कसा हल्ला करतो आणि इस्राइलच्या नागरिकांना कसं लक्ष्य करतोय हे दाखवण्यात आलंय. अतिरेक्याकडे असलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे चित्रण कैद झालेलं आहे. शेवटी इस्राइलचे लष्कर त्याला गोळी घालून ठार करताहेत हे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.
तीन मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये हमासचे दहशतवादी आधी बाईकवरुन प्रवास करतात. त्यांच्याकडे शस्रास्त्र आहेत. अनेक पोस्ट नाक्यावर ते थांबतात. तेथे इस्राइल लष्कराच्या काही जवानांना ते मारतात. त्यानंतर ते एका घरात शिरतात. तेथे घराची पाहणी केल्यानंतर ते बाहेर पडतात. याचवेळी इस्राइल लष्कराची एक गोळी या अतिरेक्याला लागते आणि तो जमिनीवर पडतो.
हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोंबरला इस्राइलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्राइलने जोरदार प्रतिहल्ला सुरु केला आहे. गाझा पट्टीतील नागरिकांना दक्षिणेत सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी स्थलांतर सुरु केले आहे. इस्राइलचा अल्टिमेटम संपला असल्याने आता कधीही गाझा पट्टीवर जमिनी हल्ला होऊ शकतो.
संघर्षामध्ये आतापर्यंत इस्राइलचे १४०० पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. गाझापट्टीमध्ये विध्वंस सुरु आहे. तेथे आतापर्यंत जवळपास २७०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात ७०० पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. अनेकांचे अपहरण झाले आहेत. येत्या काळात संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.